काळजी घ्या! १५ दिवसांत डेंग्यूचा १५ जणांना ‘डंख’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 14:23 IST2023-06-16T14:23:01+5:302023-06-16T14:23:15+5:30

डेंग्यूचे रुग्ण आता वर्षभर पहायला मिळतात. परंतु, पावसाळ्यात रुग्णांची संख्या वाढते.

Be careful! 15 people infected by dengue in 15 days | काळजी घ्या! १५ दिवसांत डेंग्यूचा १५ जणांना ‘डंख’

काळजी घ्या! १५ दिवसांत डेंग्यूचा १५ जणांना ‘डंख’

छत्रपती संभाजीनगर : जून महिना सुरू होताच डेंग्यूने हातपाय पसरायला सुरुवात केली असून, गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १५ रुग्ण आढळले. यात शहरातील ९ आणि ग्रामीण भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे.

डेंग्यूचे रुग्ण आता वर्षभर पहायला मिळतात. परंतु, पावसाळ्यात रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून विविध खबरदारी घेतली जाते. जून महिन्यात आतापर्यंत शहरात ९ आणि ग्रामीण भागात ६ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी आर. बी. ढोले यांनी दिली.

डेंग्यूची लक्षणे
ताप येणे, हे डेंग्यूचे सर्वात सामान्य लक्षण आहे. उलट्या, मळमळ, वेदना, पुरळ ही देखील डेंग्यूची लक्षणे आहेत. रुग्णाला थकवा, अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसताच वेळीत वैद्यकीय सल्ला घ्यावा.

सोमवारपासून धडक मोहीम
सोमवारपासून शहरात धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये तीन झोनचे कर्मचारी एकत्र येऊन एका झोनमध्ये काम करतील. प्रत्येक घरात ॲबेटिंग, फाॅगिंग आदी उपाययोजना केल्या जातील.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

१५ वर्षांच्या मुलीला डेंग्यू
माझ्या १५ वर्षांच्या मुलीला डेंग्यू झाला. उपचारानंतर आता तिची प्रकृती चांगली झाली आहे. महापालिकेने आमच्या भागात फवारणी करून खबरदारी घ्यावी.
- जगदीश कुमावत, रा. हनुमाननगर

Web Title: Be careful! 15 people infected by dengue in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.