शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बँक फोडून ११ लाखांची लूट

By admin | Updated: November 17, 2015 00:35 IST

लासूर-स्टेशन : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी गॅस कटरने फोडून दरोडेखोरांनी रोख ११ लाख २३ हजार ८९५ रुपयांची लूट केल्याची घट

लासूर-स्टेशन : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी गॅस कटरने फोडून दरोडेखोरांनी रोख ११ लाख २३ हजार ८९५ रुपयांची लूट केल्याची घटना सोमवारी (दि.१६) सकाळी उघडकीस आली.शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी बँक बंद करून गेलेले कर्मचारी तब्बल तीन दिवसांनी आल्यामुळे घटना नेमकी कधी घडली हे स्पष्ट झाले नाही. गेल्या सहा दिवसांत शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा चौथा मोठा दरोडा आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता बँक उघडली तेव्हा चोरी झाल्याचे दिसले. दरोडेखोरांनी कॅशियरच्या कॅबिनलगत असलेल्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश के ला. स्ट्राँग रूम उघडून गॅस कटरच्या साह्याने तिजोरीचा दरवाजा कापला. तिजोरीतील अकरा लाख तेवीस हजार आठशे रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले.माहिती मिळताच शिल्लेगावचे सहायक पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाची मदत घेण्यात आली.शाखा व्यवस्थापक सिद्धार्थ त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटील डोणगावकर, संदेश बंब, बाजार समितीचे संचालक दादासाहेब जगताप, महेंद्र पांडे यांची उपस्थिती होती.1खिडकी तोडायची... गॅस कटरने बँकेतील तिजोरी फोडायची... अन् असेल तेवढी रक्कम घेऊन पसार व्हायचे. दरोडेखोरांचे हे सत्र जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून सुरू आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या चार बँका दरोडेखोरांनी लक्ष्य बनविल्या आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण पोलिसांना याचा कसलाही सुगावा अजून लागलेला नाही. दरोडेखोरांच्या या टोळीने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. 2जिल्ह्यात आतापर्यंत कन्नड (कालिमठ), फुलंब्री (वडोद बाजार), वैजापूर शहर व गंगापूर (लासूर स्टेशन) या चार तालुक्यांमध्ये बँक फोडीच्या घटना घडल्या आहेत.3दरोडेखोरांनी ग्रामीण पोलिसांना पहिला धक्का दिला तो ३ आॅगस्टला. २ आॅगस्ट रोजी रविवारची सुटी असल्याने शनिवारी बँक बंद केल्यावर ती थेट सोमवारी उघडली. त्यामुळे चोरी नेमकी शनिवारी रात्री झाली की रविवारी याबाबत अजूनही शोध लागलेला नाही. कन्नड तालुक्यातील कालिमठ येथील महाराष्ट्र बँकेची शाखा फोडून दरोडेखोरांनी २१ लाखांचा ऐवज लंपास केला. 4या घटनेचे कसलेही धागेदोरे हाती लागलेले नसताना दरोडेखोरांनी पुन्हा एकदा त्याच ‘स्टाईलने’ वडोद बाजारची महाराष्ट्र बँक फोडली. १५ आॅगस्ट व लागून लगेच १६ आॅगस्टला रविवार आल्याने सलग दोन दिवस बँक बंद राहिली. हीच संधी साधून दरोडेखोरांनी २० लाख रुपयांची रोकड लंपास केली. पोलीस बँक फोडीच्या या घटनेमुळे पुरते गलितगात्र झालेले असताना दरोडेखोरांनी २० दिवसांनंतर ८ सप्टेंबर रोजी वैजापूरची भर वस्तीतील जिल्हा बँकेची शाखा फोडली. त्यानंतर १५ नोव्हेंबरच्या रात्री लासूर स्टेशन येथील जिल्हा बँकेला दरोडेखोरांनी लक्ष्य बनविले. वैजापूर वगळता उर्वरित बँक फोडीच्या तिन्ही घटना सुटीचा दिवस पाहून झालेल्या आहेत. दरोडेखोरांची पद्धतही एकसारखीच आहे. पोलिसांना ही टोळी नवी नाही; परंतु ती अनेक दिवसांपासून गुंगारा देत असल्याने पोलिसांचे धाबे दणाणले आहे.