शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बजाज आॅटोच्या कामगारांना १० हजार रुपयांची पगारवाढ

By admin | Updated: August 22, 2014 00:26 IST

वाळूज महानगर : बजाज आॅटो कंपनीतील कामगारांना प्रतिमाह १० हजार ५० रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : बजाज आॅटो कंपनीतील कामगारांना प्रतिमाह १० हजार ५० रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. यात ९,२०० रु. थेट व बाकीचे अप्रत्यक्षरीत्या मिळणार आहेत. ही पगारवाढ साडेतीन वर्षांसाठी लागू राहणार आहे. कंपनी व्यवस्थापन व बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे यांच्यात कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात चर्चा होऊन कामगारांच्या मागणीवरून व्यवस्थापनाने आज झालेल्या बैठकीत कामगारांना पगारवाढ करण्यात आल्याचे जाहीर केले. मागील करारात ६,५०० रु. पगारवाढ होती. यावेळी ती १० हजार ५० रुपये करण्यात आली आहे. शिवाय या करारात कामगारांना कामावर येण्यास ५ मिनिटे उशीर झाला की ६६ रुपये कापण्याची पद्धतही बंद करण्यात आली असून, कामगारांना अधिक सकस आहार मिळणार आहे. मागील करार ३१ जुलै रोजी संपला असला तरी हा करार १ आॅगस्टपासून कामगारांना लागू करण्यात आला असल्याने कामगारांचा एकही दिवस वाया जाणारनाही. या कार्यक्रमाला एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे, सचिव प्रमोद फडणीस, कोषाध्यक्ष जितेंद्रसिंह राजपूत, उपाध्यक्ष प्रकाश मांडरे, काशीनाथ चौधरी, कार्याध्यक्ष विजय पवार, सहसचिव प्रभाकर भोसले, देवीदास पवार, सहकोषाध्यक्ष सत्यविजय देशमुख, माजी अध्यक्ष बाजीराव ठेगडे, विठ्ठल कांबळे, मोतीराम कांबळे, तर कंपनी व्यवस्थापनच्या वतीने उपाध्यक्ष कैलास झांझरी, दत्ता नार्वेकर तसेच असंख्य कामगार उपस्थित होते.या पगारवाढीपैकी ९,२०० रु. प्रत्यक्ष, तर ८५० रु. अप्रत्यक्ष मिळणार आहेत. लग्न व शैक्षणिक कर्ज म्हणून ६०-६० हजार, तर दिवाळी उचल म्हणून ६ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच कॅशलेस पॉलिसीच्या नावाखाली प्रत्येक कामगाराचा प्रतिवर्षी १ लाखापासून ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा काढण्यात येणार आहे.