नादुरुस्त ट्रकला दुचाकीची धडक, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 19:30 IST2019-01-13T19:29:05+5:302019-01-13T19:30:21+5:30
रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून दुचाकी आदळून झालेल्या अपघातात पित्याचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला.

नादुरुस्त ट्रकला दुचाकीची धडक, एक ठार
करमाड : रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून दुचाकी आदळून झालेल्या अपघातात पित्याचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव शिवारात रविवारी सकाळी ६ वाजता घडली. मोतीराम धोंडू खरात (५०) हे असे मृत पित्याचे नाव असून, श्रीराम मोतीराम खरात (२३ रा. जालाननगर, औरंगाबाद) हा गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
मोतीलाल खरात व श्रीराम हे दुचाकीवरुन (एम. एच.२०- एफ बी२६२२) औरंगाबादहून रविवारी पहाटे ५ वाजता मेहकर येथे नातेवाईकांकडे निघाले होते. औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव शिवाराजवळ आले असता त्यांची दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर पाठीमागून धडकली.
यात मोतीराम खरात हे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा श्रीराम हा गंभीर जखमी झाला. करमाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रुग्णवाहिकेद्वारे जखमीला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.