शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोचालकांची मनमानी; पहाटे प्रवाशांची गैैरसोय

By admin | Updated: July 16, 2014 01:25 IST

सितम सोनवणे, लातूर मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजता रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाला चौकातील एका आॅटो चालकांने मनमानी भाडे सांगितल्याने त्याची अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आले़

सितम सोनवणे, लातूरलातूरच्या शिवाजी चौकात फेरफटका मारत असताना मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजता रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाला चौकातील एका आॅटो चालकांने मनमानी भाडे सांगितल्याने त्याची अडवणूक होत असल्याचे निदर्शनास आले़ अंबाजोगाईरोड, बार्शीरोड, औसारोड, नांदेडरोड यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणून शिवाजी चौक ओळखला जातो़ या चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लातूरच्या वैैभवात भर टाकत आहे़ शिवाजी चौकामध्ये पहाटे ४ वाजल्यापासून तुरळक प्रवासी, पदचारी, आॅटोचालकांची ये-जा चालू राहते़ मुंबई-पुण्याकडून येणाऱ्या बस, ट्रॅव्हल्स शिवाजी चौकात थांबतात़ प्रवाशी उतरतात, आॅटोचालक ‘कुठे जाणार साहेब’ म्हणून विचारतात़ प्रवासी त्यांच्या घराचा पत्ता सांगत भाडे किती म्हणून विचारतात़ त्यावर आॅटोचालक मात्र मनमानी भाडे सांगत असल्याचे दिसून आले़ यात प्रवाशांची अडवणूक मोठ्या प्रमाणात होताना दिसते़ एक प्रवासी मंगळवारी पहाटे सव्वाचारच्या दरम्यान, शिवाजी चौकातील अंबाजोगाईरोडकडे जाणाऱ्या आॅटोपाँर्इंटकडे गेला़ रेल्वे स्थानकाकडे जायचे आहे़ भाडे किती घेणार म्हणून विचारले असता आॅटोचालकाने दीडशे रूपये भाडे सांगितले़ शिवाजी चौकातून रेल्वे स्थानक तीन - चार किलोमीटर अंतरावर आहे़ त्यासाठी चक्क दीडशे रूपयांचे भाडे आॅटोचालकाने सांगितल्याने प्रवाशी शांतपणे उभा राहिला़ त्यावर आॅटोचालक पुन्हा म्हणाला, तुम्ही किती देणार साहेब, १२० तरी द्या़ नाहीतर दोन-तीन पॅसेंजर येऊ द्या़ तिघांमध्ये दीडशे रूपये द्या़ रात्रीच्या वेळी आॅटोचे दीडपट भाडे असते़ हे जरी असले तरी पहाटेच्या वेळी अशा अनेक प्रवाशांना आॅटोचालकांच्या मनमानी भाड्याचा भुर्दंड भरावा लागत आहे़ प्रवाशी आपल्या हातातील घड्याळाकडे व दुसऱ्या प्रवाशाची वाट बघत उभा राहिला़ शिवाजी चौकातील एका हॉटेलचे मालक भैैरू पवार हे कपातील पहिला चहा आणि ग्लासातील पाणी रस्त्याला अर्पण करून दोन्ही हात जोडून परत हॉटेलमध्ये गेले़ आगारातून दोन बस एका पाठोपाठ बाहेर पडल्या़ शिवाजी चौकाला फेरी मारून बस स्थानकाकडे गेल्या़ भाजी मार्केटला जाण्यासाठी काही महिला उभ्या होत्या़ दोन-तीन आॅटो एकाचवेळी येताच भाजी मार्केट किती घेणार असे विचारताच एकाने १०, दुसऱ्याने ७ असे भाडे सांगितले़ त्यात बसून त्या निघून गेल्या़ शिवाजी चौकात अंधार जास्त जाणवत होता़ उड्डाणपुलावरच्याही लाईट बंद होत्या़ महापालिकेचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष असल्याचे तसेच सीटी बसचीही उणीवही यावेळी जाणवली़