शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

औरंगाबादमधील तब्बल १,४९६ प्रदूषणकारी कंपन्या आल्या ‘एमआयडीसी’च्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 1:03 PM

एमआयडीसीने एक परिपत्रक जारी केले असून, या कंपन्यांना विस्तार करावयाचा असल्यास आपले उत्सर्जन कमी करून नियमित पातळीवर आणावे लागेल

ठळक मुद्देउत्सर्जन कमी कराअन्यथा विस्तारालाही संमती नाही

औरंगाबाद : जिल्ह्यातील १,४९६ कंपन्या प्रचंड प्रदूषण पसरवीत असल्याचे समोर आले असून, या कंपन्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रडारवर आल्या आहेत. एमआयडीसीने एक परिपत्रक जारी केले असून, या कंपन्यांना विस्तार करावयाचा असल्यास आपले उत्सर्जन कमी करून नियमित पातळीवर आणावे लागेल, असे म्हटले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने जारी केलेल्या देशातील १00 अतिप्रदूषित क्षेत्रांच्या (एरिया) २0१७-१८ च्या यादीत औरंगाबाद अतिप्रदूषित (सीव्हिअरली पोल्युटेड) श्रेणीत येते. सर्वंकष ‘पर्यावरण प्रदूषण निर्देशांका’त (सीईपीआय) औरंगाबादला ६९.८५ गुण मिळाले आहेत. प्रदूषणाची तीव्र पातळी हे गुण दर्शवितात. औरंगाबादेतील १,४९६ कंपन्या लाल (६0पेक्षा अधिक गुण) आणि नारंगी (४१पेक्षा अधिक गुण) श्रेणीत येतात, असे एमआयडीसीच्या परिपत्रकात म्हटले आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे म्हणाले की, २ जानेवारी रोजी एमआयडीसीच्या सीईओंनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लाल व  नारंगी श्रेणीतील कंपन्यांचा विस्तार निगराणीखाली आहे. या कंपन्यांना विस्तार करायचा असल्यास नियमांचे पालन करावे लागेल. प्रदूषणाची पातळी खाली आणावी लागेल.

औरंगाबादेतील ४,७६५ कंपन्यांवर प्रदूषण विभागाकडून नियंत्रण ठेवण्यात येते. त्यातील एकूण १,४९६ कंपन्या तीव्र प्रदूषण करणाऱ्या आहेत. त्यांना लाल व नारंगी रंगाची श्रेणी देण्यात आली आहे. ८६७ कंपन्या लाल श्रेणीत, तर ६२९ कंपन्या नारंगी श्रेणीत आहेत. ३,२३४ कंपन्या हरित श्रेणीत (सीईपीआय गुण २१ ते ४0) आणि ३५ कंपन्या शुभ्र श्रेणीत (सीईपीआय गुण २0च्या आत) येतात. हरित आणि शुभ्र श्रेणी प्रदूषण न करणाऱ्या कंपन्यांची समजली जाते.‘मराठवाडा एन्व्हायरन्मेंटल केअर क्लस्टर’चे (एमईसीसी) संस्थापक अध्यक्ष आणि स्थानिक उद्योजक बी. एस. खोसे यांनी सांगितले की, ज्या कंपन्या प्रदूषण करीत आहेत, त्यांना शोधून दंड करायला हवा. ज्या कंपन्या प्रदूषण करीत नाहीत, त्यांना जबाबदार धरता कामा नये.

सूचनांची अंमलबजावणी करीत आहोत :‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर’चे (सीएमआयए) उपाध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, या समस्येबाबत सरकारी संस्थांकडून आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. औरंगाबादेतील कंपन्या त्यावर काम करीत आहेत.

महाराष्ट्रात नऊ क्षेत्रे अतिप्रदूषितएमआयडीसीच्या परिपत्रकानुसार, देशातील १00 अतिप्रदूषित क्षेत्रांच्या यादीत नऊ क्षेत्रे महाराष्ट्रातील आहेत. 

ही नऊ क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत :तारापूर (सीईपीआय गुण ९३.६९)चंद्रपूर (सीईपीआय गुण ७६.४१)औरंगाबाद  (सीईपीआय गुण ६९.८५)डोंबिवली (सीईपीआय गुण ६९.६७)नाशिक (सीईपीआय गुण ६९.४९)नवी मुंबई (सीईपीआय गुण ६६.३२)चेंबूर (सीईपीआय गुण ५४.६७)पिंपरी-चिंचवड (सीईपीआय गुण ५२.१५)महाड (सीईपीआय गुण ४७.१२)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpollutionप्रदूषणMIDCएमआयडीसी