शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद हादरले! प्रेमप्रकरणातून संशोधक तरुणाने स्वत:ला पेटवून घेत तरुणीला कवटाळले

By राम शिनगारे | Updated: November 21, 2022 15:38 IST

दोघांची सध्या मृत्यूशी झुंज सुरु आहे.शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार करण्यात येत आहेत

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात पीएच.डी.चे संशोधन करणाऱ्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत संशोधक तरुणीला कवटाळले. ही घटना शासकीय विज्ञान संस्थेतील बायोफिजिक्स विभागाच्या प्रयोगशाळेत सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. यात तरुण ९० टक्क्यांपेक्षा अधिक, तर तरुणी ४० टक्क्यांपेक्षा अधिक जळाल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. मुलाची प्रकृती चिंताजनक असून, दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

गजानन खुशालराव मुंडे (२९, ह.मु. पीएचडी वसतिगृह, विद्यापीठ, रा. दाबा दिग्रज, ता. जिंतूर, जि. परभणी) व पूजा कडूबा साळवे (२८, ह.मु. एन ७, रा. दहेगाव, ता. सिल्लोड) असे जळालेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; गजानन हा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात पीएच.डी.चे संशाेधन करतो, तर पूजा ही शासकीय विज्ञान संस्थेच्या बायोफिजिक्स विभागात संशोधन करते. दोघांचे मार्गदर्शक एकच आहेत.

पूजाला रविवारी तिच्या एका सहकारी महिलेने विभागात बोलावून घेतले होते. तिच्यामागे गजानन हासुद्धा विभागातील प्रयोगशाळेत आला. त्याने येताच पाठीवरील बॅगमधून पेट्रोलची बाटली काढत स्वत:च्या अंगावर ओतून घेतली. काही पेट्रोल पूजाच्याही अंगावर फेकले. तेव्हा तिच्या सहकारी महिलेने तिला पळून जाण्यास सांगितले. तेवढ्यात गजानन याने प्रयोगशाळेचा दरवाजा बंद केला; तसेच त्याने लायटरने स्वत:ला पेटवून घेतले. त्याच्या अंगाने पेट घेताच त्याने पळत जाऊन पूजाला कवटाळले. पेट्रोल असल्यामुळे काही वेळातच आग सर्वत्र पसरली. पूजाने स्वत:ला त्याच्या तावडीतून सोडवून घेतले, मात्र तोपर्यंत तिचा चेहरा, डोक्याचा काही भाग जळाला होता. एकाएकी घडलेल्या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. संस्थेतील इतरांनी आग नियंत्रणात आणून दोघांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत गजानन हा ९० टक्क्यांपेक्षा अधिक, तर पूजा ४० टक्क्यांपेक्षा अधिक जळाली आहे. गजानन याची प्रकृती गंभीर असून, दोघांवर ‘आयसीयू’मध्ये उपचार सुरू आहेत.

प्रेमप्रकरणातून झाली घटनादरम्यान, गजानन आणि पूजाचे प्रेम संबंध होते. मात्र, काही महिन्यांपासून पूजा आणि गजाननमध्ये वाद सुरु होते. पूजा त्याला टाळत होती. यामुळे गजानन अस्वस्थ होता. यातूनच गजाननने आज स्वतःला पेटवून घेत पूजाला मिठी मारली, अशी माहिती आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीCrime Newsगुन्हेगारीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद