शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कचरा संकलक कंपनीसमोर मनपाचे रेड कार्पेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 6:48 PM

पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसमोर मनपा प्रशासनाने रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे.

ठळक मुद्देपार्किंगसाठी पाच जागा मोफतमालकीच्या ७० रिक्षाही दिल्या

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसमोर मनपा प्रशासनाने रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे. कंपनीची वाहने उभी करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी मोफत स्वरूपात महापालिकेने भूखंड उपलब्ध करून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या मालकीच्या ७० रिक्षाही कंपनीला वापरण्यासाठी देण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या रिक्षांची देखभाल दुरुस्ती अनेक महिन्यांपासून महापालिका करीत आहे. एका खाजगी कंपनीचे एवढे लाड पुरविल्यानंतरही कंपनी एक मेट्रिक टन कचरा उचलल्यानंतर मनपाकडून १६८० रुपये वसूल करीत आहे.

कंपनीने पहिल्या दिवसापासून व्यावसायिक धोरण स्वीकारले आहे. कंपनीचे १ कोटी ३९ लाख रुपयांचे बिल लेखा विभागात प्रलंबित आहे. कंपनीच्या कामगारांनी मंगळवारी कामबंद आंदोलन करून मनपाला, शहराला वेठीस धरले. कंपनीला तातडीने ५० लाख रुपये द्या, अशी शिष्टाई महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली. कंपनी काम सोडून पळून जाईल, या भीतीपोटी कंपनीच्या सर्व मागण्या विनाअट मंजूर करण्यात येत आहेत. मनपाने कंपनीसोबत केलेल्या करारात पार्किंगसाठी मोफत भूखंड उपलब्ध करून देण्याचा कुठेच उल्लेख नाही. तरीही कंपनीला एन-१२, शिवाजीनगर पाण्याची टाकी, उल्कानगरी, रमानगर, मध्यवर्ती जकात नाका येथे पार्किंगसाठी भूखंड देण्यात आले आहेत. या भूखंडापोटी मनपा कंपनीकडून एक रुपयाही भाडे घेत नाही, हे विशेष.

शहरातील ११५ वॉर्डांतील कचरा संकलन करण्यासाठी कंपनीने स्वत:च्या नावावर असलेली वाहने खरेदी करावीत, अशी अट आहे. महापालिकेने तब्बल ७० रिक्षा कंपनीला कचरा उचलण्यासाठी दिल्या आहेत. या सर्व रिक्षांचे मेंटेनन्स आजही मनपा प्रशासन करीत आहे. कंपनी आपल्या इतर रिक्षांसोबत मनपाच्या रिक्षांचीही देखभाल दुरुस्ती करू शकते, पण मनपा प्रशासन लाखो रुपये खर्च करीत आहे.

संमिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणार तरी कशी?- कंपनीने शहरातील ११५ वॉर्डांतील नागरिकांच्या दारावर जाऊन कचरा जमा करावा, असे करारात नमूद केले आहे. मोजक्याच वॉर्डांमध्ये डोअर-टू- डोअर कलेक्शन सुरू आहे. अनेक वॉर्डांमध्ये कंपनी गल्लोगल्लीत पडलेला कचरा उचलण्याचे काम करीत आहे. - एकाही नागरिकाच्या दारावर कंपनी जाण्यास तयार नाही. कंपनीने ओला व सुका कचरा वेगळा जमा केला पाहिजे, असेही करारात म्हटले असताना मोठ्या वाहनांमध्ये सर्व कचरा मिक्स करून प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येत आहे. - मिक्स कचऱ्यावर प्रक्रिया करणार तरी कशी, असा प्रश्न प्रक्रिया करणाऱ्या कंत्राटदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

सहा झोनमध्ये कामकंपनीला आपले काम सुरू करून पाच महिने होत आले तरी शहरातील सहा झोनमधीलच कचरा कंपनी जमा करीत आहे. उर्वरित तीन झोनमध्ये आजही महापालिका लाखो रुपये खर्च करून कचरा संकलन, वाहतूक करीत आहे. कंपनीने काम सुरू केल्यावर मनपाची कोट्यवधी रुपयांची बचत होईल, असे दिवास्वप्न प्रशासनाने दाखविले होते. या खर्चात किंचितही फरक पडलेला नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद