लग्नाची मागणी केल्याने प्रेयसीचा डोक्यात दगड घालून खून; देवळाई खून प्रकरणाचा झाला उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 14:52 IST2019-01-30T14:50:10+5:302019-01-30T14:52:26+5:30
मंगळवारी देवळाई परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली.

लग्नाची मागणी केल्याने प्रेयसीचा डोक्यात दगड घालून खून; देवळाई खून प्रकरणाचा झाला उलगडा
औरंगाबाद : शहरालगतच्या देवळाई परिसरात मंगळवारी (दि.२९ ) सायंकाळी गोदावरी गणेश खलसे या विधवा महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय निंभोरे (वय २३,मिसारवाडी ) असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देवळाई परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह विद्रूप करण्यात आल्याचे दिसले. पोलिसांनी गोदावरी गणेश खलसे (३३, रा. हनुमाननगर, गल्ली नंबर ४) अशी मृत महिलेची ओळख पटवली. त्या २६ जानेवारीपासून बेपत्ता होत्या.
यानंतर तपासाला वेग देत सहायक निरीक्षक सत्यजीत ताईतवाले आणि कर्मचाऱ्यानी मध्यऱात्री तीन वाजता संजय निंभोरे यास ताब्यात घेतले. आरोपी संजय आणि मृत गोदावरी या सिडको एन १ येथील एका बुक बायंडींग कंपनीत कामाला होते. या दरम्यान त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले. यातूनच गोदावारीने लग्नाची मागणी केल्याने तिचा खून केल्याची कबुली आरोपी संजयने दिली आहे.
लग्नाची मागणी केल्याने खून
२६ जानेवारीला संजयने गोदावरीला दुचाकीवरून साई टेकडीकडे आणले. येथे गोदावरी, मला जगायचं नाही. मला मारून टाक नाहीतर मी आत्महत्या करते' असे म्हणाली. यावर आत्महत्या केल्यास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल असे वाटून संजय घाबरला. यामुळे संजयने गोदावरीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला.ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा विद्रूप केला.असा कबुली जबाब आरोपीने दिला आहे.