औरंगाबाद-हैदराबाद ७४९ रुपयांत विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 13:43 IST2019-06-26T13:38:28+5:302019-06-26T13:43:50+5:30
या आॅफरसाठी ३० जूनपर्यंत बुकिंग करता येणार आहे

औरंगाबाद-हैदराबाद ७४९ रुपयांत विमानसेवा
औरंगाबाद : ट्रू जेट विमान कंपनीने प्रवाशांसाठी अवघ्या ७४९ रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी खास आॅफर जाहीर केली आहे. त्यामुळे औरंगाबाद ते हैदराबाद विमान प्रवास अवघ्या ७४९ रुपयांत करण्याची संधी औरंगाबादकरांना मिळणार आहे.
या आॅफरसाठी ३० जूनपर्यंत बुकिंग करता येणार आहे, तर ३१ मार्च २०२० पर्यंतची कोणत्याही तारखेला या आॅफरमधील दराने प्रवास करता येणार आहे. औरंगाबादहून हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. गेली अनेक वर्षे केवळ रेल्वे आणि वाहतूक सुविधेने प्रवाशांना हैदराबादला जाता येत होते. ट्रू जेटने औरंगाबाद- हैदराबाद विमानसेवा सुरूकेली आणि त्यास प्रवाशांचा अवघ्या काही दिवसांत मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. या विमानसेवेमुळे औरंगाबादला हैदराबाद आणि तिरुपतीशी हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली.
छोट्या विमानाद्वारे कंपनीकडून विमानसेवा दिली जात आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी काही आसने अवघी काही ७४९ रुपयांत उपलब्ध करून देण्याची आॅफर या कंपनीने जाहीर केली आहे. आॅनलाईन बुकिंग करणाऱ्यांना या आॅफरचा लाभ घेता येणार आहे. ही आॅफर औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवेसाठीही लागू असल्याची माहिती ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांनी दिली.