औरंगाबाद- हैदराबाद आणखी जवळ आले, वॉटर सॅल्यूट देऊन फ्लाय बिगच्या विमानसेवेस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 10:04 IST2022-06-01T09:54:19+5:302022-06-01T10:04:15+5:30

वॉटर सॅल्यूट देऊन नव्या विमानसेवेचे स्वागत औरंगाबाद विमानतळावर करण्यात आले

Aurangabad- Hyderabad came even closer, Fly Big's flight started with a water salute | औरंगाबाद- हैदराबाद आणखी जवळ आले, वॉटर सॅल्यूट देऊन फ्लाय बिगच्या विमानसेवेस सुरुवात

औरंगाबाद- हैदराबाद आणखी जवळ आले, वॉटर सॅल्यूट देऊन फ्लाय बिगच्या विमानसेवेस सुरुवात

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या फ्लाय बिग एअरलाईन्सची विमानसेवा बुधवारी सकाळी सुरू झाली. औरंगाबादहून २३ प्रवासी हैदराबादला रवाना झाले, तर ३५ प्रवासी हैदराबादहून शहरात दाखल झाले.

या विमानसेवेच्या उदघाटनप्रसंगी औरंगाबाद टुरिझम डेव्हल्पमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष व उद्योजक सुनीत कोठारी, जसवंत सिंग, विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे आदी उपस्थित होते.

असे राहील वेळापत्रक 
फ्लायबिगचे विमान हैदराबादहून सकाळी ६ वाजता उड्डाण घेईल आणि सकाळी ७.२० वाजता औरंगाबादला येईल. त्यानंतर हे विमान सकाळी ७.४० वाजता औरंगाबादहून झेप घेईल आणि सकाळी ९.१० वाजता हैदराबादला पोहोचेल. 

Web Title: Aurangabad- Hyderabad came even closer, Fly Big's flight started with a water salute