औरंगाबादला २२ वर्षांनी मिळाला स्वत:चा पालकमंत्री; संदीपान भुमरेंकडे मोठी जबाबदारी  

By बापू सोळुंके | Published: September 24, 2022 11:24 PM2022-09-24T23:24:47+5:302022-09-24T23:25:54+5:30

सूतगिरणी चौकातील संपर्क कार्यालयासमोर समर्थकांनी फटाके फोडून आणि ढोल वाजवून जल्लोष केला.

Aurangabad got its own Guardian Minister after 22 years; Sandipan Bhumre has a big responsibility | औरंगाबादला २२ वर्षांनी मिळाला स्वत:चा पालकमंत्री; संदीपान भुमरेंकडे मोठी जबाबदारी  

औरंगाबादला २२ वर्षांनी मिळाला स्वत:चा पालकमंत्री; संदीपान भुमरेंकडे मोठी जबाबदारी  

googlenewsNext

औरंगाबाद : मुख्यमंत्री सचिवालयाने शनिवारी रात्री राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहिर केली. या यादीनुसार औरंगाबादचे  पालकमंत्रीपद पैठण विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आले. भुमरे यांच्यामुळे तब्बल २२ वर्षानंतर औरंगाबाद जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाल्याने शिंदेगटाने भुमरे यांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला.

राज्यात १९९५ साली शिवसेना भाजपचे शिवशाही सरकार आले होते. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असलेल्या मंत्रीमंडळात औरंगाबादचे स्थानिक आमदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. यानंतर काँग्रेस, आघाडी सरकार आले तेव्हा बाहेरील जिल्ह्यातील पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात या मंत्र्यांकडे औरंगाबादचे पालकमंत्रीपद होते. २०१४ ते २०१९ या भाजप-सेना युतीच्या सरकारमध्येही औरंगाबादचे पालकमंत्रीपदी रामदास कदम, एकनाथ शिंदे होते. दरम्यान  दिड महिन्यापूर्वी राज्यात सत्तारुढ झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आज अखेर राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावाची यादी घोषित केली. औरंगाबादचे पालकमंत्रीपद रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आले. भुमरे यांच्या रुपाने तब्बल २२ वर्षानंतर औरंगाबादला स्थानिक पालकमंत्री मिळाला.

भुमरे यांच्या कार्यालयासमोर समर्थकांचा जल्लोष

मंत्री भुमरे यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याचे कळताच त्यांच्या सूतगिरणी चौकातील संपर्क कार्यालयासमोर समर्थकांनी फटाके फोडून आणि ढोल वाजवून जल्लोष केला. यावेळी शिंदेगट जिल्हाप्रमुख रमेश पवार, माजी जि.प. सभापती विलास भुमरे,रामराव शेळके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

भाजपचा नंबर कधी?

 भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याकडे औरंगबादच्या पालकमंत्रीपदाची एकदाही जबाबदारी देण्यात आलेली नाही. औरंगाबाद पूर्व चे आमदार अतुल सावे यांच्याकडे औरंगाबादचे पालकमंत्रीपद येईल अशी चर्चा होती.मात्र त्यांच्याकडे जालना आणि बीडची जबाबदारी सोपविल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

Web Title: Aurangabad got its own Guardian Minister after 22 years; Sandipan Bhumre has a big responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.