औरंगाबाद : माणिक हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, काही रुग्ण किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 14:45 IST2018-04-02T12:31:01+5:302018-04-02T14:45:59+5:30

गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटलला भीषण आग लागली आहे.

Aurangabad: Fire in Manik Hospital | औरंगाबाद : माणिक हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, काही रुग्ण किरकोळ जखमी

औरंगाबाद : माणिक हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, काही रुग्ण किरकोळ जखमी

औरंगाबाद : औरंगाबादच्या गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी(2 एप्रिल) अचानक आग लागली. दुपारच्या सुमारास ही आग लागली.  मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या तळमजल्यावर काम सुरू होते, तेथे सुरुवातीला आग लागली. यानंतर आगीनं रौद्र रुप धारण करत ती वरील मजल्यांपर्यंत पसरली. घटनेत काही रुग्ण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  

औरंगाबाद अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “तीन अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. पाच पाण्याचे टँकर आणि चार गाड्याही घटनास्थळी पोहोचले आहेत''. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 40 रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 20 अॅम्ब्युलन्सच्या मदतीने या रुग्णांना औरंगाबादमधील इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

Web Title: Aurangabad: Fire in Manik Hospital