शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

इंधन महागल्याने औरंगाबाद आगाराची दरमहा ७० लाखांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 7:30 PM

दरवाढीचा फटका एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानक आगाराला बसत असून, महिन्याला ७० लाख रुपयांचा आर्थिक बोजा आगारावर पडत आहे.

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा १२ रुपये ५६ पैशांनी डिझेल महागले आहे. दरवाढीचा फटका एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानक आगाराला बसत असून, महिन्याला ७० लाख रुपयांचा आर्थिक बोजा आगारावर पडत आहे. इतर सातही आगारांची कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती असल्याचे दिसून येते. 

गत काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव वाढल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वधारल्या आहेत. याचा परिणाम महागाई वाढण्यात होत असल्याचे दिसते. जिल्ह्यातील सर्वात मोठे औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक आगार असून, शिवनेरी ८, शिवशाही २५, निमआराम ३८, परिवर्तन ८७ बसेस आहेत. या आगारातून मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, इंदूर, सुरत आदी मार्गांवर बसेस सोडल्या जातात. प्रवासी आणि बसेसची संख्या पाहता दररोज १५ हजार लिटर डिझेलची गरज आगाराला भासते. गतवर्षी या महिन्यात डिझेलचे दर प्रति लिटर ५९ रुपये ५९ पैसे होते. ते सध्या १२ रुपये ५६ पैशांनी वधारले आहेत. सध्या महामंडळाला ७२ रुपये १५ पैसे प्रति लिटर दराने डिझेलचा पुरवठा केला जात आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे मध्यवर्ती बसस्थानक आगाराला डिझेलपोटी दररोज १ लाख ८८ हजार ४०० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. दर महिन्याला जवळपास ७० लाख रुपयांचा फटका डिझेल दरवाढीमुळे मध्यवर्ती बसस्थानक आगाराला सहन करावा लागत आहे. 

दररोज १५ हजार लिटर डिझेलचा वापरजिल्ह्यातील सर्वात मोठे आगार मध्यवर्ती बसस्थानकाचे असून, प्रवाशांची संख्याही मोठी असते. बसेसचा विचार केल्यास दररोज १५ हजार लिटर डिझेल लागते. दर वाढल्याने महिन्याला ७० लाख रुपयांचा फटका बसत आहे. - अमोल भुसारी, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक, औरंगाबाद

टॅग्स :state transportएसटीFuel Hikeइंधन दरवाढAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानक