दुर्दैवी! रक्षाबंधनाच्या दिवशीच बहीण भावाला कारची धडक; भावाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 13:03 IST2019-08-15T13:00:58+5:302019-08-15T13:03:58+5:30

गंभीर जखमी झालेल्या बहिणीवर उपचार सुरू

in aurangabad brother died and sister critically injured after an accident | दुर्दैवी! रक्षाबंधनाच्या दिवशीच बहीण भावाला कारची धडक; भावाचा मृत्यू

दुर्दैवी! रक्षाबंधनाच्या दिवशीच बहीण भावाला कारची धडक; भावाचा मृत्यू

औरंगाबाद: ध्वजारोहणासाठी शाळेत जात असलेल्या बहीण भावाला भरधाव कारने चिरडल्याची घटना झाल्टा फाट्यावर घडली. या अपघातात मुलाचा मृत्यू झाला असून मुलीची प्रकृती गंभीर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीपासून भाऊ दुरावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (वय ९ वर्षे) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर श्रावणी शिंदे (वय ११ वर्षे) असे गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. अपघातानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी संभाजीला मृत घोषित केले. तर श्रावणीवर उपचार सुरू आहेत. भरधाव वेगाने बहीण भावाला उडवल्याची माहिती समजताच संतप्त स्थानिकांनी रास्तारोको केला. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक अन्य मार्गाने वळवली.
 

Web Title: in aurangabad brother died and sister critically injured after an accident

टॅग्स :Accidentअपघात