शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

‘नकुशी’ समजून टाकलेले ‘ते’ बाळ ऑक्सिजनवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 3:17 AM

केवळ १२०० ग्रॅम वजनाच्या या बाळाची प्रकृती गंभीर असून जगण्यासाठी संघर्ष सुरू

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या व मुलगी समजून आईने शेतात फेकलेल्या टुणकी (जि. औरंगाबाद) येथील बाळावर घाटीत उपचार सुरू आहेत. केवळ १२०० ग्रॅम वजनाच्या या बाळाची प्रकृती गंभीर असून जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे.पाच मुलींनंतर सहाव्यांदाही मुलगी झाल्याचा समज करून या बाळाला सुनीता साळुंके या मातेनेच शेतात फेकून दिल्याची घटना ३० सप्टेंबरला घडली. गावात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याच्या चचेर्नंतर हे बाळ माझेच असल्याचे मातेने म्हटले. या बाळावर बुधवारपासून घाटीतील बालरोग विभागाच्या वॉर्ड-२५ मध्ये उपचार सुरू आहेत. येथे दाखल झाल्यापासून बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. बाळ वॉर्मरमध्ये असून त्याला जंतुसंसर्ग झाला आहे. कृत्रिम आॅक्सिजन देण्यात येत आहे. बालकल्याण समितीने केअर टेकर म्हणून भारतीय समाजसेवा केंद्रातील एक आया घाटीत पाठविली आहे.प्रतिमिनिट ५ लिटर आक्सिजन, प्रतिजैविकेचार दिवसांच्या या बाळाला प्रतिमिनिट ५ लिटर आॅक्सिजन लागत आहे. हृदयाची गती, रक्तदाब योग्य राहण्यासाठी उच्च प्रतिजैविके (हायर अँटीबायोटिक) देण्यात येत आहे.अति कमी वजनाचे बाळघाटीचे प्रभारी बालरोग विभागप्रमुख डॉ. अमोल सूर्यवंशी म्हणाले, ‘हे बाळ अति कमी १२०० ग्रॅम वजनाचे आहे. २८ ते ३० आठवड्यांनंतर बाळाचा जन्म झाल्याचे दिसते. जन्मताच फेकून दिल्याने जंतुसंसर्ग झाला, हे सांगता येणे कठीण आहे.’ डॉ. शिल्पा पवार म्हणाल्या, बाळाची प्रतिकारशक्ती कमी आहे. औषधोपचार सुरू आहे.