शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतही हवी मेट्रो रेल्वे

By admin | Updated: August 22, 2014 00:21 IST

नजीर शेख, औरंगाबाद सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी औरंगाबादमध्येही मेट्रो रेल्वे हवी,

नजीर शेख, औरंगाबादगेल्या काही वर्षांतील सार्वजनिक वाहतुकीची आपल्या शहरातील व्यवस्था पाहिल्यास त्यात मोठी सुधारणा झाल्याचे दिसत नाही. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी औरंगाबादमध्येही मेट्रो रेल्वे हवी, असे मत औरंगाबादेतील प्रसिद्ध विकासक पापालाल गोयल आणि प्रसिद्ध विधिज्ञ प्रदीप देशमुख यांनी मांडले. ‘माझ्या शहरात काय हवे? ’ या विषयासंदर्भात दोन भिन्न क्षेत्रातील या तज्ज्ञांनी मेट्रो रेल्वे हवीच, असे मत मांडले. येत्या काही वर्षांत औरंगाबाद शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वेची आतापासूनच तयारी करायला हवी, असे मत गोयल आणि देशमुख यांनी मांडले.गोयल म्हणाले की, आपल्या असे ऐकिवात आहे की, वाळूजमध्ये आलेल्या एक-दोन उद्योजकांना खराब रस्ते आणि वाहतुकीच्या समस्येमुळे चिकलठाणा विमानतळ वेळेवर गाठणे शक्य झाले नाही आणि त्यांचे विमान चुकले. ही नुसती चर्चा जरी असली तरी यातून शहरातील वाहतूक व्यवस्थेची परिस्थिती आपल्यासमोर येते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यासाठी आता औरंगाबादेत मेट्रो रेल्वे सेवा असायला हवी. मी शांघायला गेलो असताना तेथे आम्ही २४ कि. मी. चे अंतर १२ ते १३ मिनिटांत कापले. चीनमध्ये रस्ते वाहतुकीत अडथळा आल्यामुळे कुणाची ‘फ्लाईट’ मिस होत नाही. सर्व टाईम टू टाईम. आपल्याकडे रस्त्यावरून वाहन चालवायचे म्हणजे अंगावर काटा येतो. त्यासाठी मेट्रो रेल्वे असायला हवी आणि त्याची मागणी आतापासूनच करायला हवी. अ‍ॅड. देशमुख म्हणाले की, मागील चार- पाच वर्षांपासून औद्योगिक विकासाची गती वाढली आहे. सध्या शहराची लोकसंख्या १४ लाख आहे. येत्या काही वर्षांत शहर परिसरात ३० कि. मी. पर्यंत विस्तार होणार आहे.किमान ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहराची गरज भागविणाऱ्या सुविधा शहरात असायला हव्यात. या शहरात गरीब तसेच मध्यमवर्गीयांना परवडेल अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. शहर बसही तोकडी आहे. महापालिकेची स्थापना होऊन रौप्यमहोत्सव झाला तरी शहर बसबाबत महापालिकेला खंत ना खेद. या पार्श्वभूमीवर शहरात मेट्रो रेल्वे हवी. राज्य शासनाने पुणे आणि नागपूर या दोन शहरांच्या मेट्रो रेल्वेसाठी प्रस्ताव पाठविले होते. यावेळी औरंगाबादचा मात्र विसर पडलेला दिसतो. नागपूर कराराप्रमाणे जे जे विदर्भाला द्याल ते ते मराठवाड्याला मिळालेच पाहिजे, याचा विसर मुख्यमंत्र्यांना का पडला. औरंगाबाद शहर आणि परिसर जोडण्यासाठी आणि जनसामान्यांना परवडेल अशा दरात वाहतुकीची व्यवस्था व्हावी, यादृष्टीने आतापासूनच नियोजन हवे. शहराच्या विकास आराखड्याचे पुनर्विलोकन येत्या वर्षभरात होणार आहे. शिवाय प्रादेशिक विकास योजनादेखील मंजूर झाली आहे. झालर क्षेत्राच्या विकासाचा आराखडाही लवकरच मंजूर होईल. याच टप्प्यावर मेट्रो रेल्वेचे नियोजन हा विकास आराखड्याच्या पुनर्विलोकनाचा एक भाग म्हणून होणे आवश्यक आहे.