शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अभियंत्याच्या पत्नीला भाजपाची उमेदवारी: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 19:06 IST

चार हजार कोटीचा भष्टाचाराचे पुरावे आम्ही सरकारला दिले. पण त्यांनी काही कारवाई केली नाही. उलट त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली: नाना पटोले

फुलंब्री : पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या विभागात चार हजार कोटीचा भष्टाचार केला. त्याचे पुरावे आम्ही सरकारला दिले. पण त्यांनी काही कारवाई केली नाही. उलट त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. भाजपा भ्रष्टाचाऱ्यांसोबत आहे, त्याचे हे ज्वलंत उदाहरण, असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते शनिवारी वडोदबाजार येथे महाविकास आघाडीचे उमेदार विलास औताडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते             फुलंब्री विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,खासदार डॉ कल्याण काळे, खासदार चंद्रकांत हंडोरे हे जालना येथील सभा आटोपून वडोदबाजार येथे तीन वाजता पोहचले. विलास औताडे यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांनी तडाखेबंद भाषण केले. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही पांढऱ्या दगडावरील काळी रेघ आहे. सरकार आल्यावर देवगिरी साखर करण्यावर असलेले सर्व कर्ज सरकार भरणार व कारखाना सुरु केले जाईल, असे आश्वासन पटोले यांनी दिले. तसेचमराठवाड्यात वॉटरग्रीडचा प्रश्न मंत्री मंडळाच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत घेऊन काम पूर्ण करू, असेही पटोले म्हणाले.

दरम्यान, या सभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष आनंदा ढोके ,धनगर समाजाचे नेते रवी खिल्लारे यांनी नाना पटोले यांच्या उपस्थिती मध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जेष्ठ नेते केशवराव औताडे,उमेदवार विलास औताडे,माजी मंत्री अनिल पटेल,आमदार वजाहत मिर्जा ,शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसुफ ,कमाल फारुकी ,जगन्नाथ काळे,छाया जंगले,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर,शिवसेना तालुकाध्यक्ष सोमनाथ करपे ,वरून पाथ्रीकर ,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे ,धनश्री कांबळे ,कैसर आझाद ,बॉरिष्टर उमर फारुकी ,मुद्दसर पटेल आदि सह अनेकांची उपस्थिती होती. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदी बोलत नाहीतदेशाचे पंतप्रधान बटेंगे तो कटेंगे बोलतात पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत, इतका दुर्बल पंतप्रधान देशान एकही पहिला नाही. तुकडे करा आणि राज्य करा हेच धोरण त्यांनी मागील दहा वर्षांपासून अवलंबविले आहे, त्याच्यावर विश्वास न ठेवता विकासासाठी विलास औताडे यांना निवडून द्यावे असे आवाहन पटोले यांनी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकphulambri-acफुलंब्रीNana Patoleनाना पटोले