भांडण सोडविणाऱ्या तरूणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 20:35 IST2019-05-04T20:35:01+5:302019-05-04T20:35:12+5:30

शहागंज येथील लेबर नाक्यावर दोघांतील भांडण सोडविणाºयाला एकाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना १ मे रोजी घडली. याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी अतिक याच्याविरोधात गुन्हा नोंदविला.

An attack on a young man who has a brawler | भांडण सोडविणाऱ्या तरूणावर हल्ला

भांडण सोडविणाऱ्या तरूणावर हल्ला

औरंगाबाद: शहागंज येथील लेबर नाक्यावर दोघांतील भांडण सोडविणाºयाला एकाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना १ मे रोजी घडली. याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी अतिक याच्याविरोधात गुन्हा नोंदविला.


मुकुंदवाडीतील संजयनगर येथील काशीनाथ सुखदेव पाचगे हे कामानिमित्त शहागंज येथील कामगार नाका येथे उभे होते. यावेळी कृष्णा आणि अतिक यांच्यात भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्याकरीता पाचगे हे मध्यस्थी करू लागताच अतिकने दारूची काचेची बाटली मानेवर मारून जखमी केले.

या घटनेत पाचगे यांच्या मानेचा मनका मोडला, शिवाय कानाला आणि कानाखाली जखम झाली. यानंतर उपचार घेतल्यानंतर पाचगे यांनी ३ मे रोजी सिटीचौक ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी अतिकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे तपास करीत आहे.

Web Title: An attack on a young man who has a brawler