चुलतभावाचा साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 20:51 IST2018-03-04T20:51:07+5:302018-03-04T20:51:22+5:30

घराशेजारी राहणा-या चुलतभावाने साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जुना मोंढा परिसरातील रेंगटीपुरा घडली.

Atrocity of the three-year-old Chimudadi of Culattabhava | चुलतभावाचा साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

चुलतभावाचा साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

औरंगाबाद: घराशेजारी राहणा-या चुलतभावाने साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जुना मोंढा परिसरातील रेंगटीपुरा घडली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

याविषयी अधिक माहिती अशी की, आरोपी हा २६ वर्षीय अविवाहित तरूण असून तो वेल्डिंगच्या दुकानात काम करतो. आरोपी आणि पीडितेचे कुटुंब जुना मोंढा परिसरातील रेंगटीपुरा येथे एकाच वाड्यात राहतात. त्याच्या मोठ्या आणि लहान भावाचा विवाह झालेला आहे. २ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पीडिता तिच्या घरात एकटी असताना आरोपीने चिमुकलीला पाळीव प्राणी दाखविण्याच्या अमिष दाखवून गच्चीवर नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडिता रडू लागल्याने त्याने तिला सोडले आणि तो घराबाहेर पडला.

घराबाहेर असलेली तिची आई घरी आल्यानंतर चिमुकलीने रडतच ही घटना सांगितली. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी दुस-या दिवशी चिमुकलीला घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी या घटनेची माहिती जिन्सी पोलिसांना कळविली. शिवाय त्यांचा अभिप्रायही कळविला. यानंतर पीडितेच्या मातेने दिलेल्या तक्रारीवरून जिन्सी पोलिसांनी आज रविवारी आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्यास अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्ही.आर. काळे तपास करीत आहेत.

Web Title: Atrocity of the three-year-old Chimudadi of Culattabhava