शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

सहायक पोलीस निरीक्षकाला ८० हजारांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:19 AM

वाळूजमध्ये भंगार व्यावसायिकाला मागितले होते २ लाख

ठळक मुद्देयासोबतच चार पोलीस कर्मचाऱ्यांना एसीबीनी ताब्यात घेतले आहे वाळूज मध्ये भंगार खरेदी-विक्रीची अनेक दुकाने

औरंगाबाद : विभागीय आयुक्तालयातील लिपिकाने ४० हजार रुपयांची लाच घेण्याचे प्रकरण होऊन एक दिवस होत नाही तोवरच गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक राहुल रोडे यास लाचलुचपत विभागाने एका भंगार व्यावसायिकाकडून ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 

सहायक पोलीस निरीक्षक रोडे हा वाळूज एम. आय. डी. सी.  ठाण्यातील डी. बी. पथक प्रमुख म्हणून कार्यरत होता.  त्याला दोन महिन्यांपूर्वीच उपनिरीक्षक पदावरून बढती मिळाली होती. भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडे रोडे याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. भंगार खरेदी माहितीचे रेकॉर्ड ठेवणे आणि चोरीचे भंगार खरेदी केल्यानंतर कारवाई न करण्यासाठी पथकप्रमुख म्हणून रोडेने दोन लाख रुपये मागितले होते. त्यातील ८० हजार रुपये घेताना  लाचलुचपत विभागाने रोडेला पकडले. भंगार व्यावसायिकाची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. यानंतर पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधिक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनखाली अन्य अधिकाऱ्यांनी एमआयडीसी वाळूज ठाणे परिसरात सापळा रचला. तेव्हा सहायक पोलीस रोडेने तक्रारदार व्यावसायिकाकडून ८० हजार रुपये लाच घेताच पथकाने त्यास पकडले. रोडेसोबत असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना एसीबीनी ताब्यात घेतले आहे त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती उपअधीक्षक गावडे यांनी दिली . त्या चौघांचा गुन्ह्यात सहभाग आहे, अथवा नाही, याची खात्री झाली की त्यांची नावे सांगू असे गावडे म्हणाले.

वाळूज मध्ये भंगार खरेदी-विक्रीची अनेक दुकानेही कारवाई पोलिस निरिक्षक गणेश धोकरट यांनी गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास केली. कंपन्यांमधील भंगार खरेदी विक्रीच्या एमआयडीसी वाळूज परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. एका कंपनीतील भंगार खरेदीवरून दुकानदारावर कारवाई न करण्यासाठी राहुल रोडे व डीबीच्या कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी  केली होती. ८० हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र भंगार दुरानदाराने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविली. पोलिस व निरीक्षक धोकरट व त्यांच्या पथकानेने सापळा रचून ८० हजार रुपये रोख घेताना राहुल रोडे याला अटक केली. या प्रकारानंतर पोलिस खात्यात खळबळ उडाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग