विशेष शाखेचे सहायक उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:54 IST2019-08-14T18:53:28+5:302019-08-14T18:54:16+5:30
गोरख चव्हाण हे १९८८ साली पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबलपदी भरती झाले.

विशेष शाखेचे सहायक उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक
औरंगाबाद: पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल दिल्या जाणारे राष्ट्रपतीचे पोलीस पदक शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक गोरख मानसिंग चव्हाण यांना जाहिर झाले.
गोरख चव्हाण हे १९८८ साली पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबलपदी भरती झाले. उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पोलीस हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक पदी बढती मिळाली. या कालावधीत त्यांनी जिन्सी ठाणे, क्रांतीचौक, एमआयडीसी सिडको , गुन्हेशाखेत काम केले. चार वर्षापासून ते विशेष शाखेत कार्यरत आहे. ३०वर्ष सहा महिन्याच्या सेवा कालावधीत त्यांना २७१ रिवॉर्डस प्राप्त झाले. पोलीस महासंचालकाचे पदक ही त्यांना प्राप्त झाले होते. त्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेत राष्ट्रपतीचे पोलीस पदक बुधवारी त्यांना जाहिर झाले. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद ,उपायुक्त मिना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे आदींसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.