राजकीय वैमस्यातून भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 14:03 IST2021-01-09T14:01:15+5:302021-01-09T14:03:20+5:30
crime news स्टेशन रोडवरील तिवारी मंगल कार्यालयाजवळ केला हल्ला.

राजकीय वैमस्यातून भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
औरंगाबाद: भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या शहर उपाध्यक्षावर राजकीय वैमस्यातून चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना ७ जानेवारी रोजी रात्री १०:१५ वाजता घडली. गंभीर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
बंटी राजू चावरिया (वय ३२, रा.गांधीनगर ) असे जखमी कार्यकर्त्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, बंटी हा भाजप युवा मोर्चाचा शहर उपाध्यक्ष आहे. तो गुरुवारी रात्री त्याच्या भावाच्या सासऱ्याना घेऊन रेल्वेस्टेशन येथे जात होता. स्टेशन रोडवरील तिवारी मंगल कार्यालयाजवळ मनीष लाहोटने त्याच्या दुचाकीसमोर त्याची बुलेट आडवी लावून पकडले. यानंतर त्याने फोन करून तीन अनोळखी साथीदारांना बोलावून घेतले. साथीदार आणि मनीषने बंटीवर धारदार शस्त्र आणि रॉडने हल्ला केला. या तो गंभीर जखमी झाला. यावेळी त्याचा भाऊ मदतीला येताच हल्लेखोर पळून गेले. पो.उप.नि. प्रमोद देवकते तपास करीत आहेत.