शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारी उत्सवाची तयारी

By admin | Updated: July 5, 2014 00:44 IST

नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव हे गाव प्रतिपंढरपूर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. येत्या ९ जुलै रोजी देवशयनी एकादशी निमित्ताने भव्य यात्रा भरते.

नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव हे गाव प्रतिपंढरपूर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. येत्या ९ जुलै रोजी देवशयनी एकादशी निमित्ताने भव्य यात्रा भरते. हजारो भाविक नर्सी येथे संत नामदेव दर्शनासाठी येतात. त्यांच्या संरक्षणासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून यंदा जादा बंदोबस्त मागविला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली.बंदोबस्तात ११ अधिकारी, ७४ कर्मचारी, १५ महिला कर्मचारी, १० शहर वाहतूक शाखेचे पोलिस, राज्य राखीव दलाचे ३० जवान तैनात केले जाणार आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कार्यालय हिंगोली, प्राथमिक आरोग्य केंद्र, बिनतारी संदेश यंत्रणा, पोलिस मुख्यालयातून राहोट्या, बॅरिकेटस्, दुर्बीण यांची मागणीही केली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसेस सोडण्याची मागणी व संत नामदेव मंदिराजवळून जाणाऱ्या देवूळगाव, कडती, जवळा या बसेसचा मार्ग बदलून घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे.सा. बां. चे काम सुस्तावलेनर्सी येथे आषाढी वारीसाठी भाविकांना रस्त्यावरून चालण्यासाठी चांगला रस्ता नाही. जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे वाहने रस्त्याच्या बाजूला उभे करण्यास जागाच उरली नाही. वाहन कुठे उभे करावे? असा प्रश्न वाहतूकदारांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.आरोग्य पथकाची तयारीनर्सीत येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरविण्याच्या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्राकडून एक पथक तयार करण्यात आले आहे. त्यात डॉ. एस. पी. परदेशी, डॉ. गोरे, दहातोंडे, भुजबळे यांचा समावेश आहे. उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर औषधीसाठा उपलब्ध असल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले.दिवसभर वीजपुरवठा राहणारमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नर्सी येथील कनिष्ठ अभियंता जी. के. रनवीर यांच्याशी संपर्क साधला असता नामदेव मंदिराजवळील वीजपुरवठा दिवसभर सुरळीत राहील, असे त्यांनी सांगितले.संस्थानच्या हद्दीतील स्वच्छतागृह चालू ठेवण्याची मागणीनर्सी नामदेव संस्थानच्या जागेत २ वर्षीपासून स्वच्छतागृहाचे बांधकाम झाले आहे; परंतु त्याचा वापर होत नाही. भाविकांच्या सोयीसाठी हे स्वच्छतागृह चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दर्शनबारीची असुविधाशासनाकडून ३५ लाख खर्च करून संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांना त्रास होवू नये म्हणून रस्ता तयार करण्यात आला; परंतु पाऊस, पाणी यापासून बचाव करण्यासाठी अद्याप सुविधा नाहीत भक्तांना याचा सामना करावा लागत आहे. शासन, प्रशासनाने संस्थानच्या कामास गती नर्सीचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)संत नामदेव मंदिर गर्दीने फुलणार भक्तांचे दर्शन सुलभ होण्यासाठी वेळ निश्चिती करून दर्शन रांग तयार करण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांच्या सेवेसाठी नामदेव संस्थान, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील स्वयंसेवक तयार राहणार आहेत. संत नामदेव मंदिराच्या मागे विठ्ठलाचे भव्य मंदिर व सभागृह बांधण्यासाठी २९ लाख ७३ हजारांची मंजूरी मिळाल्यानंतर हे काम २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने या कामाची निविदा उशिरा निघाली व कामास पाहिजे तेवढी गती मिळाली नाही. यात ६० लाखांची गुंंतवणूक झाली असल्याचे सांगण्यात आले. परंतु ही रक्कम योग्य वेळेत वापरली नाही म्हणून परत गेल्याचे समजले हे काम अधुरे राहिलेले आहे.