आशा वर्कर यांच्यावर अंगणवाडीची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:22 AM2017-09-22T00:22:23+5:302017-09-22T00:22:23+5:30
अंगणवाडी कर्मचाºयांचे १२ सप्टेंबर पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू असून या दरम्यान पोषण आहार न मिळाल्याने अंगणवाडी केंद्रातील ६ वर्ष वयापर्यंतचे बालक, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांची जबाबदारी आशा वर्कर यांच्याकडे सोपवली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अंगणवाडी कर्मचाºयांचे १२ सप्टेंबर पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू असून या दरम्यान पोषण आहार न मिळाल्याने अंगणवाडी केंद्रातील ६ वर्ष वयापर्यंतचे बालक, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांची जबाबदारी आशा वर्कर यांच्याकडे सोपवली आहे़
जिल्ह्यातील ३०११ अंगणवाडी कार्यकर्ती, ३०११ अंगणवाडी मदतनीस व ५७६ मिनी अंगणवाडी कार्यकर्ती आहेत़ या अंगणवाडी सेविकांचे काम आता आशा वर्कर सांभाळणार आहेत़
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील साडेसहा अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला आहे़ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे़ त्यामुळे कुपोषीत बालके, गर्भवती महिला व स्तनदा मातांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांच्या जागेवर आशा वर्कर यांना २० सप्टेंबरपासून काम सोपविले आहे़
दरम्यान, शासनाने संपकरी अंगणवाडी सेविकांना कामावर जाण्याचे आदेश दिले आहेत़ त्यांच्या मागण्यावर विचार करण्याचे आश्वासनही दिले आहे़ अंगणवाडी सेविकांनी दिल्ली, तेलंगना, गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ राज्यातील अंगणवाडी सेविका प्रमाणे १० हजार रूपये दरमहा वेतन देण्याची मागणी केली आहे़