ठाकरे बंधूंची युती, मनसेला खिंडार; छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शिंदेसेनेत, शहराध्यक्ष भाजपत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:21 IST2025-12-24T18:14:37+5:302025-12-24T18:21:11+5:30

पक्ष स्थापनेपासून सोबत असणाऱ्या सुमित खांबेकरांचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

As soon as the Thackeray brothers' alliance was announced, MNS's Chhatrapati Sambhajinagar district president joined Shinde Sena, city president in BJP | ठाकरे बंधूंची युती, मनसेला खिंडार; छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शिंदेसेनेत, शहराध्यक्ष भाजपत

ठाकरे बंधूंची युती, मनसेला खिंडार; छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शिंदेसेनेत, शहराध्यक्ष भाजपत

छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या राजकारणात 'ठाकरे बंधू' (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि शहरात पक्षाचा मुख्य चेहरा असलेले सुमित खांबेकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. तर मनसे शहराध्यक्ष आशिष सुरडकर आणि गजन गौडा यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

स्थापनेपासूनची साथ सुटली! 
सुमित खांबेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. शहरात मनसेची बांधणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय मनसेसाठी मोठा फटका मानला जात आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

"शहरासाठी काम करायचंय!" 
सोशल मीडिया पोस्ट चर्चेत पक्षप्रवेशापूर्वी सुमित खांबेकर यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. "मला छत्रपती संभाजीनगरसाठी काम करायचं आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या मनातील खंत आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली. केवळ पदासाठी नाही, तर शहराच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे संकेत त्यांनी यातून दिले आहेत.

मनसेला फटका, शिंदेसेनेची ताकद वाढली
छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेची ताकद असलेल्या काही मोजक्या नेत्यांपैकी खांबेकर एक होते. त्यांनी पक्ष सोडल्याने मनसेच्या संघटनात्मक बांधणीला तडा गेला आहे. तर दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून शिंदेसेनेने मनसेचा मोठा मोहरा आपल्याकडे खेचून आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपले पारडे जड केले आहे. ठाकरे बंधूंची युती आता छत्रपती संभाजीनगरमध्ये किती प्रभावी ठरते आणि खांबेकरांच्या जाण्याने पडलेली पोकळी मनसे कशी भरून काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title : ठाकरे बंधुओं की युति के बाद मनसे नेता शिंदे सेना में शामिल।

Web Summary : ठाकरे बंधुओं के पुनर्मिलन की चर्चा के बीच, मनसे औरंगाबाद के प्रमुख सुमित खांबेकर शिंदे की शिवसेना में शामिल हुए। चुनावों से पहले मनसे के लिए एक झटका; खांबेकर ने शहर के काम को अपना कारण बताया।

Web Title : MNS leader defects to Shinde's Sena after Thackeray alliance news.

Web Summary : Amidst Thackeray reunion buzz, MNS Aurangabad chief Sumit Khambekar joined Shinde's Shiv Sena. A setback for MNS before elections; Khambekar cited city work as his reason.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.