शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय प्रमाणपत्रांसाठी कलाकारांची धावपळ !

By admin | Updated: December 31, 2014 01:03 IST

बीड : स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीसाठी आधी स्वत: व सासूरवाडीत शौचालये बांधा असे फर्मान सीईओ नामदेव ननावरे यांनी कलावंतांना सोडले़

बीड : स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीसाठी आधी स्वत: व सासूरवाडीत शौचालये बांधा असे फर्मान सीईओ नामदेव ननावरे यांनी कलावंतांना सोडले़ त्यामुळे कलावंतांनी आता प्रमाणपत्रांसाठी धावपळ सुरु केली आहे़जिल्ह्यात शौचालये उभारण्यासाठी जि़प़ ने जनजागृतीवर भर दिला आहे़ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक बैठकीमध्ये शौचालयाचा विषय ठरलेलाच असतो़ शौचालय जनजागृतीचे काम मानधन तत्वावर देण्यात यावे, यासाठी कलावंतांनी सीईओ ननावरे यांना साकडे घातले़ भू्रण हत्या, शिक्षण, दारुबंदी आदी सामाजिक विषयांवर यापूर्वी या कलावंतांनी ढोलकी, पेटीच्या सहाय्याने पोवाडे, पथनाट्य सादर करुन जनजागृती केलली आहे़ आता शौचालय बांधून प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांची लगबग सुरु केली आहे़जि़प़ मध्ये आहे का शौचालय?अखिल भारतीय शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलास काटे यांनी जिल्हा परिषदेतील शौचालयांची दुरवस्था झालेली आहे़ जि़प़ मध्ये येणाऱ्यांसाठी प्रशासनाने स्वच्छतागृहाची सोय केली आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे़ कलावंत गरीब आहेत, त्यांच्याकडे स्वत:ची जागा नाही़ स्वत:सह सासूरवाडीत शौचालये बांधण्याची अट जाचक असल्याचे ते म्हणाले़त्यात चूक काय?कलावंतांना शासकीय अनुदानातून शौचालये बांधण्यास सांगणे चुकीचे आहे का? असा सवाल सीईओ नामदेव ननावरे यांनी उपस्थित केला़ जनजागृती करणाऱ्यांकडेच शौचालये नसतील तर चुकीचा संदेश जाईल़ त्यामुळे त्यांना शौचालये बांधणे बंधनकारक केल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले़(प्रतिनिधी)