शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची आज चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 3:54 PM

रसायने फवारल्यानंतर १५ मिनिटे ते एक तासात पाऊस पडण्याचा दावा

ठळक मुद्दे५२ दिवसांसाठी प्रयोग सी-९० हे विमान दाखल  प्रयोगासाठी राज्य व केंद्राच्या विभागाकडून १५ परवानग्या

औरंगाबाद : दीड महिन्याच्या चर्चेनंतर कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला मुहूर्त लागला आहे. शुक्रवारी प्रयोगाची चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी सी-९० हे विमान विमानतळावर शुक्रवारी सकाळी दाखल झाले. मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात ५२ दिवस कृत्रिम पावसाचे प्रयोग होतील, अशी माहिती सुकाणू समितीचे अध्यक्ष तथा भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) माजी शास्त्रज्ञ डॉ. जी. आर. कुलकर्णी यांनी दिली. 

विभागीय आयुक्तालयात सी-डॉप्लर रडार बसविले असून ते कार्यान्वितही करण्यात आले आहे. मुंबईहून आलेल्या तंत्रज्ञ, अधिकारी, कर्मचा-यांची शास्त्रज्ञांनी आयुक्तालयात गुरुवारी कार्यशाळा घेतली. त्यानंतर डॉ. कुलकर्णी, हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी प्रयोगाबाबत पत्रकारांना माहिती दिली. याप्रसंगी श्रीरंग घोलप, कानुराज बगाटे, दत्त कामत, महसूल उपायुक्त सतीश खडके, उपजिल्हाधिकारी मृणालिनी निंबाळकर, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांची उपस्थिती होती. 

प्रयोगासाठी राज्य व केंद्राच्या विभागाकडून १५ परवानग्याही घेतल्या आहेत. शुक्रवारी प्रयोगाच्या चाचणीसाठी प्रथम विमानाचे उड्डाण होणार असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. रसायने फवारल्यानंतर १५ मिनिटे ते एक तासात पाऊस होईल, असा दावा यावेळी करण्यात आला. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत प्रयोग करण्याचे नियोजन असून, त्यापुढे परतीच्या पावसासाठी यंत्रणा ठेवली जाईल, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. 

ढगाचा अंदाज घेतल्यानंतर प्रयोग नियंत्रण कक्षात रोज सकाळी ११ वाजता तंत्रज्ञांची बैठक होईल. यात ढगांचा अंदाज घेऊन पाऊस पाडण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर सिल्व्हर कोटेड सिलिंडर्ससह विमान उड्डाण घेईल. औरंगाबादसह सोलापूर, नागपूर, मुंबई व पुणे येथील रडारचीही मदत घेतली जाईल. कमी पाऊस झालेल्या भागातच कृत्रिम पावसाचा प्रयोग होईल. प्रयोगाअंती किती पाऊस झाला याची नोंद घेतली जाईल. एकदा उड्डाण घेतलेल्या विमानातून १० ते १५ ढगांवर फवारणी केली जाऊ शकते. २०० किलो रसायन घेऊन उडण्याची क्षमता विमानात आहे. विमान ६ तास हवेत राहू शकते, असा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला.

टॅग्स :RainपाऊसDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयMarathwadaमराठवाडा