सिल्लोडमध्ये ३ जिनिंगवर सशस्त्र दरोडा; १६ लाखाची रोकड लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:16 IST2019-07-03T12:14:26+5:302019-07-03T12:16:37+5:30
सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेची नोंद झाली आहे.

सिल्लोडमध्ये ३ जिनिंगवर सशस्त्र दरोडा; १६ लाखाची रोकड लुटली
सिल्लोड (औरंगाबाद) : शहरातील औरंगाबाद रोडवरील शिवम, पुनीत, हरिओम या तीन जीनिंगवर मंगळवारी (दि.२ ) रात्री सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी तिजोरी फोडून तब्बल 16 लाख 4 हजार रुपयाच्यावर रोकड पळवल्याची प्राथमिक माहिती आहे.
मंगळवारी रात्री दरोडेखोर हातात हॉकी स्टिक, रॉड, चाकूसह या जिनिंगमध्ये घुसले. यावेळी सर्व दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते. काही दरोडेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासोबतच डोंगरगांव येथील एक शाळेतही दरोडा पडल्याची माहिती आहे.
दरोडेखोरांनी हरिओम जिनिंगमधून 1 लाख, शिवम कॉटनमधून 4 लाख 37 हजार आणि पुनीत जीनिंगमधून 10 लाख 67 हजार रुपये लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे.