शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

शिपायावरच चालते आरोग्य उपकेंद्र !

By admin | Updated: October 2, 2014 00:37 IST

राजेंद्र नाटकर ,राक्षसभुवन गोरगरीबांना कमी खर्चात उपचार व्हावेत या उद्देशाने ठिकठिकाणी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहेत.

राजेंद्र नाटकर ,राक्षसभुवनगोरगरीबांना कमी खर्चात उपचार व्हावेत या उद्देशाने ठिकठिकाणी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहेत. मात्र गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनच्या आरोग्य उपकेंद्रातील परिस्थिती भयावह आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने येथील शिपाईच आलेल्या रूग्णांवर उपचार करतात. याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात.राक्षसभुवन हे गाव तीर्थक्षेत्र शनिच्या मंदिरामुळे ओळखले जाते. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्रांतर्गत तीन- चार मोठ्या गावांसह असंख्य वाड्या- वस्त्यांचा समावेश आहे. मात्र येथे येणाऱ्या रूग्णांना कुठल्याही सोयी- सुविधा पुरविल्या जात नाहीत. येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे व औषध निर्मात्याचे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. तसेच तीन परिचारीकांचा कारभार एका परिचारीकेवरच असल्याने त्याच्यावरही ताण येत आहे. ताण आल्याने या परिचारीका रूग्णांना त्रास देत असल्याचा आरोप होत आहे. या उपकेंद्रात औषधांचाही तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. उपस्थित अधिकारी, कर्मचारी उपकेंद्रात हजर राहत नसल्याने रूग्णांना खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. त्याचा आर्थिक भूर्दंडही बसत आहे. याबाबत उमापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोळुंके म्हणाले, रिक्त पदांसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ही पदे भरू व रूग्णांचे हाल होणार नाहीत याची काळजी घेऊ.