शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद ते पैठण मार्गाच्या निविदेला मंजुरी

By admin | Updated: September 12, 2014 00:31 IST

औरंगाबाद : औरंगाबाद - पैठण रस्त्याच्या नूतनीकरणास होत असलेल्या विलंबामुळे या मार्गावर सतत अपघात होत.

औरंगाबाद : औरंगाबाद - पैठण रस्त्याच्या नूतनीकरणास होत असलेल्या विलंबामुळे या मार्गावर सतत अपघात होत. याप्रकरणी दाखल याचिकेत सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सविस्तर शपथपत्र सादर केले. रस्त्याच्या निविदांना शासनाने मंजुरी दिली असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.अ‍ॅड. रितेश जैस्वाल यांनी गतवर्षी औरंगाबाद शहरातील खड्डेमय रस्ते आणि औरंगाबाद-पैठण रस्त्याची झालेली दुरवस्था याबाबत जनहित याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर यापूर्वी सुनावणी झाली, तेव्हा औरंगाबाद- पैठण रस्त्याचे नूतनीकरण करण्याची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, याबाबत सविस्तर शपथपत्र सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते. ही याचिका न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्यासमोर सुनावणीसाठी आली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सविस्तर शपथपत्र सरकारी वकिलांनी खंडपीठात दाखल केले. या शपथपत्रानुसार औरंगाबाद- पैठण रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्या अंतिम मंजुरीकरिता शासनाच्या अर्थ विभागाकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्या निविदांना शासनाने मंजुरी दिल्याचे मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. संभाजी टोपे यांनी न्यायालयास सांगितले. मात्र, कोणत्या कामांना मंजुरी मिळाली, तसेच औरंगाबाद ते फर्दापूर मार्ग, वडीगोद्री ते जालना या मार्गांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची तोंडी माहिती न्यायालयास देण्यात आली. मात्र, अचूक अशी सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालयाने त्याबाबत दुसरे शपथपत्र सादर करण्याचे निर्देश सरकार पक्षाला देऊन याचिकेची सुनावणी एक आठवड्यानंतर ठेवली.