शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी अनिता सूर्यतळ यांचाच अर्ज

By admin | Updated: July 12, 2014 00:48 IST

हिंगोली : हिंगोलीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अनिता सूर्यतळ यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार

हिंगोली : हिंगोलीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अनिता सूर्यतळ यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार, हे निश्चित झाले आहे. मात्र या निवडीची घोषणा होण्यासाठी १५ जुलैची वाट पहावी लागणार आहे. हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम १० जुलैपासून सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी कोणीही अर्ज दाखल केला नव्हता. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अनिता सदाशिव सूर्यतळ यांनी दुपारी १२ च्या सुमारास अर्ज पीठासन अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्याकडे दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत मावळते नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक गणेश लुंगे, जगजीतराज खुराणा, अ‍ॅड. भुक्तर, आमेर अली, अनिल नैनवाणी, बाबूराव कदम, आरेफ शेख, शकील शेख, नगरसेविका सुरेखा जयस्वाल, वसंताबाई लुंगे, निरगुणा बोथीकर, शरद जयस्वाल आदींची उपस्थिती होती. त्यानंतर काँग्रेसच्या सदस्या आशाताई उबाळे या उमेदवारी दाखल करतील, अशी चर्चा होती; परंतु त्यांनी अर्ज दाखल केला नाही. विशेष म्हणजे नगरपालिकेत अनुसूचित जाती महिला प्रवर्गात अनिता सूर्यतळ व आशाताई उबाळे या दोनच सदस्या आहेत. आता नगराध्यक्षपदासाठी सूर्यतळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडीची घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे.१५ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता अध्यक्ष निवडीची सभा होणार आहे. त्यावेळी सूर्यतळ यांची अधिकृत निवड जाहीर होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)उपनगराध्यक्षपदासाठी हिंगोलीत रस्सीखेचनगराध्यक्षांची निवड बिनविरोध होणार असली तरी उपनगराध्यक्ष पदासाठी मात्र रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, माजी उपनगराध्यक्ष बिरजू यादव, नगरसेवक आमेर अली हे उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. कळमनुरी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३ उमेदवारांचे ४ अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्याधिकारी के. एम. वीरकुंवर यांनी दिली. नगराध्यक्षपदासाठी १० अर्जांची विक्री करण्यात आली. काँग्रेसच्या यासमीनबी शेख फारुक यांचे दोन अर्ज, मुख्तारबी हमीदुल्ला पठाण यांचा एक अर्ज तर सेनेच्या गिरीजाबाई बाबाराव खोडके यांचा एक असे एकूण ३ उमेदवारांचे चार अर्ज दाखल करण्यात आले. ११ जुलै रोजी दुपारी दोन वाजेनंतर आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. चारही अर्ज वैध ठरविण्यात आले असल्याचे वीरकुंवर यांनी सांगितले.हिंगोली नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने फोडाफोडीचे राजकारण नाही.हिंगोलीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असून, पालिकेत २८ पैकी राष्ट्रवादीच्या अनिता सूर्यतळ व काँग्रेसच्या आशाताई उबाळे या दोनच महिला या प्रवर्गातील आहेत.