शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही या, दारु घेऊन जा !

By admin | Updated: December 31, 2014 01:03 IST

सोमनाथ खताळ/ राजेश खराडे ल्ल बीड थर्टीफर्स्टच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी शौकिन घड्याळाकडे अक्षरश: डोळे लावून बसले आहेत़

सोमनाथ खताळ/ राजेश खराडे ल्ल बीडथर्टीफर्स्टच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी शौकिन घड्याळाकडे अक्षरश: डोळे लावून बसले आहेत़ ‘जब मिल बैठेंगे तीन यार’ म्हणत मैफिल अधिक रंगतदार करण्यासाठी ‘थोडी- थोडी पिया करो’ चा आग्रह होणारच आहे़ त्यामुळे स्थळ, वेळ निश्चित करुन ‘माल’ घेऊन ठेवण्यासाठी मंगळवारी देशी-विदेशी दारु दुकानांवर शौकिनांच्या रांगा होत्या़ मात्र, ‘पिण्या’साठी परवाना घ्यावा लागतो याचा अनेकांना विसर पडला आहे़ गल्ला भरण्याच्या नादात विके्रतेही ग्राहकाकडील परवाना, वय याची कुठलीच खातरजमा करत नाहीत़ ‘लोकमत’ने ‘थर्टी फर्स्ट’च्या पूर्वसंध्येला केलेल्या स्टिंगमधून ही धक्कादायक बाब पुढे आली़ असे केले स्टिंग...‘लोकमत’ प्रतिनिधी शहरातील दारुदुकानांमध्ये ग्राहक बनून गेले़ दारू विक्रीसाठी व पिण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घेणे अवश्यक असते. मात्र शहरासह ग्रामीण भागात परवान्याची खात्री न करताच दारू विक्री करतात, असे आढळले़ दारू घेण्यासाठी सुटाबुटातल्यांपासून ते लोकांना सुरक्षितता देण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांपर्यंत सर्वांचीच गर्दी होती. एका दुकानावर तर दोन शाळकरी मुलेही रांगेत होती. हे सर्व कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. पोलिसांसमोर मद्यपींचा धिंगाणाशहरातील काही निवडक दुकानांची पाहणी केली असता, पोलीसांसमोरच मद्यपींचा धिंगाणा चालु होता. नियमानूसार कोणी जर सार्वजनीक ठिकाणी अथवा, रस्त्यावर धिंगाना घालत असेल तर त्याला समंस किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते.कुठलीही विचारपूस नाहीनगर नाक्यावरील त्याच दुकानात आम्ही प्रवेश केला. यावेळी दारू बॉटल मागीतली. यावेळी त्याने मागेपुढे न पाहता आमच्यासमोर ‘टँगो’ ठेवली. ४० रूपये मागीतले. अक्षरश: दारू खरेदीसाठी गर्दी झाली होती. मात्र येथे येणाऱ्या कुठल्याच नागरीकाला परवान्याची विचारपूस करण्यात येत नव्हती.बिअर बारमध्येही नाही विचारपूसशहरातील काही बिअर बारमध्येही चमूने भेटी दिल्या. मात्र कुठल्याच प्रकारची विचारपूस न करता वेटर ने तीन ग्लास समोर मांडले. आणि सांगा साहेब कुठला ‘पॅक’ आणायचा. यावर आम्ही संबंधीताला परवाना विचारत नाहीत का? असे विचारल्यावर तो बिनधास्तपणे नाही म्हणाला. यावरून बिअर बारवालेही किती बिनधास्त आहेत, हे पहावयास मिळते.गतवर्षी २० हजार किमतीचे परवानेजिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी व मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे ३ लाख लीटर दारूचा स्टॉक झाला असल्याचे समजते. ग्राहकांजवळ दारू बरोबर पेयाचा परवाना असणेही आवश्यक आहे. गतवर्षी केवळ २० हजार किमतीच्या परवान्यांची विक्री करण्यात आली असल्याचे येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.परवान्याविनाच विक्रीग्राहकांना राज्य उत्पादन शुल्क किंवा दारू खरेदीच्या ठिकाणाहून मद्यपान करण्याचा परवाना दिला जातो. मात्र शहरातील जवळपास ४० परमीट-रूम, १८ देशी दारूच्या दुकाने तर ६० बीअर-शॉपी मध्ये ग्राहकांकडे परवाने नसतानाही दारू विकली जाते. परवान्याचे शुल्क असेराज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून मद्य शौकिनांसाठी परवाने दिले जातात. एक दिवसाच्या देशी दारूकरिता २ रुपये तर विदेशी करिता ५ रुपयाचा परवाना घेणे ग्राहकांना बंधनकारक असते. तर १०५० रुपये भरून ग्राहकाला जीवनभर दारू पिण्याचा परवाना दिला जातो.जिल्ह्यात ७८ देशी दारू दुकानेजिल्ह्यात केवळ ७८ देशी दारुच्या दुकानांना दारू विक्रीचा परवाना आहे. मात्र ग्रामीण भागातील गल्ली बोळात अवैध दारू विक्री होत असताना दिसत आहे.