शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मृग नक्षत्रावर भिस्त

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

परभणी: कृषी क्षेत्रामध्ये मृग नक्षत्राला मोठे महत्त्व आहे.

परभणी: कृषी क्षेत्रामध्ये मृग नक्षत्राला मोठे महत्त्व आहे. पावसाळ्यातील हे पहिले आणि मोठे नक्षत्र म्हणून याकडे पाहिले जाते. या नक्षत्रात पेरणी झाली तर हंगाम चांगला येतो. त्यामुळे या नक्षत्रात शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा असते. रविवारपासून मृग नक्षत्र सुरू झाले असून, शेतकऱ्यांना या नक्षत्रात मोठ्या अपेक्षा आहेत.८ जून रोजी सकाळी ११.३० वाजेपासून मृग नक्षत्र सुरू झाले. पावसाळ्यात नऊ नक्षत्र असून, त्यातील पाच नक्षत्रात जरी पाऊस झाला तरी भरपूर उत्पन्न मिळते. परंतु दहा वर्षांपासून (मागील वर्षीचा अपवाद वगळता) मृग नक्षत्र शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गणितेच बिघडून जात आहेत. बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेती व्यवसायाला सहन करावा लागत आहे. मृगनक्षत्रापासूनच पावसाळ्याला प्रारंभ होत असल्याने हे नक्षत्र लागण्याच्या आधीपासूनच शेतकरी मशागतीच्या कामांना प्रारंभ करतो. यावर्षी शेतकऱ्यांचा विश्वास असलेल्या भंडवळ भविष्यवाणीने मृगनक्षत्रात अधिक पाऊस दर्शविला आहे. तसेच यावर्षीच्या मृगनक्षत्राचे वाहन हत्ती आहे. हत्ती हे वाहन असल्यास जास्त पाऊस पडेल, अशी धारणा आहे. त्यामुळे हे नक्षत्र सुरू होण्याच्या आधीच शेतकऱ्यांनी मोठी तयारी केली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झाल्याने खरीप हंगामावर शेतकऱ्यांना मोठ्या आशा आहेत. (प्रतिनिधी)पंचांग काय सांगतो...येथील पंचांग अभ्यासक धुंडीराज करभाजन यांनी पंचांगात नक्षत्रानुसार वर्तविलेल्या पावसाची माहिती दिली. त्यानुसार मृग नक्षत्रात ११ जूननंतर पावसाचे चांगले योग दिसून येतात. १९ जून रोजी गुरु कर्क राशीत येतो त्यानंतर सार्वत्रिक पावसाचे योग संभवतात. या नक्षत्रातील दुसरे आणि शेवटचे चरण चांगल्या वृष्टीचे आहे. या काळात पेरण्यांना सुरूवात होऊ शकते.आर्द्रा : या नक्षत्रात २ जुलैनंतर मध्यम पावसाचे योग आहेत. बहुतांश भागात पाऊस होऊन पेरण्या साधल्या जातील. या काळात हवामानात दमटपणा संभवतो.पुनर्वसू : पावसाची प्रतीक्षा करावी लागेल. पुष्य : २४ जुलै रोजी रवी, गुरू युती होत असल्याने पावसाचे प्रमाण चांगले राहिल. उत्तरार्धात सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे. २६ ते ३१ जुलै या काळात पावसाचे योग. अश्लेषा : ३ आॅगस्ट रोजी बुध, गुरू युती आणि ८ आॅगस्ट रोजी रवि-गुरु युती पर्जन्ययोग दर्शवितात. ३ ते ५ आणि ९ ते १३ आॅगस्ट पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.मघा : १७ आॅगस्ट रोजी मघा नक्षत्रात सूर्याचा प्रवेश होत असून, रवि, बुध, गुरू, शुक्र जल नाडीत आहेत. १८ आॅगस्ट रोजी गुरु, शुक्र युती पर्जन्यकारक असल्याने या नक्षत्रात पूर्वार्धात पाऊस होईल. २० ते २४ आॅगस्ट सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे.पूर्वा : ५ ते ९ सप्टेंबर या काळात पाऊस अपेक्षित.उत्तरा : या नक्षत्रात खंड वृष्टी संभवते.हस्त : यावर्षी हे चांगले वृष्टीकारक नक्षत्र आहे. नवरात्रात अधूनमधून हस्ताच्या जोरदार सरी येतील.चित्रा : १८ आॅक्टोबरनंतर पावाचे प्रमाण कमी होण्याच चिन्हे आहेत.स्वाती : पावसाचे हे शेवटचे नक्षत्र असून, या नक्षत्राच्या पहिल्या चरणात पाऊस संभवतो.मागील स्थितीमागील वर्षी मान्सूनपूर्व पावसानेच धडाक्यात सुरुवात केली होती. रोहिणी नक्षत्रात जोरदार पाऊस झाला. ४ जूनपासून पावसाला प्रारंभ झाला. ८ जून रोजी मृग नक्षत्र लागले. त्यापूर्वी ७ जूनपर्यंत ११४ मि.मी. पाऊस झाला. ८ ते २२ जून या काळात मृग नक्षत्र होते. या नक्षत्रात ५७.३ मि.मी. पाऊस झाला होता. गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात १२१६.१ मि.मी. पाऊस झालेला आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने दिली.