संतापजनक ! दिराने अत्याचार केलेल्या पीडितेवर सासरच्या मंडळींकडून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 13:33 IST2021-02-22T13:31:43+5:302021-02-22T13:33:52+5:30

Crime News दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेच्या असाहाय्यतेचा फायदा घेत सहा महिन्यांनंतर दिराने तिच्यावर अतिप्रसंग केला.

Annoying! Attack on rape victim by her father-in-law's congregations | संतापजनक ! दिराने अत्याचार केलेल्या पीडितेवर सासरच्या मंडळींकडून हल्ला

संतापजनक ! दिराने अत्याचार केलेल्या पीडितेवर सासरच्या मंडळींकडून हल्ला

ठळक मुद्दे सासरच्या मंडळींकडून विवाहिता व तिच्या आई-वडिलांविरुद्ध सतत खोट्या तक्रारी दाखल शाब्दिक बाचाबाची सुरू असताना सासूने तीक्ष्ण हत्याराने विवाहितेच्या डाव्या हातावर वार केला.

औरंगाबाद : विवाहितेवर दिराने अत्याचार केल्याची घटना न्यायप्रवीष्ट असताना सासरच्या मंडळींनी पीडितेवर तीक्ष्ण हत्याचाराने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर घडली. याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी दोन्हीकडील मंडळींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेच्या असाहाय्यतेचा फायदा घेत सहा महिन्यांनंतर दिराने तिच्यावर अतिप्रसंग केला. याची वाच्यता केल्यास तलाक देण्याची धमकी दिल्यामुळे विवाहितेने ही घटना आई-वडिलांपासून लपवून ठेवली. शेवटी घडलेला प्रसंग विवाहितेने आपल्या आई-वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी सातारा पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त कार्यालयाचे उंबरठे झिजविल्यानंतर दिराविरुद्ध अखेर गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर सासरच्या मंडळींकडून विवाहिता व तिच्या आई-वडिलांविरुद्ध सतत खोट्या तक्रारी दाखल केल्या जाऊ लागल्या. याबद्दलची माहिती अधिकाराखाली मागितलेली माहितीची कागदपत्रे घेण्यासाठी विवाहिता आईसोबत सिटीचौक ठाण्याच्या मागे असललेल्या कार्यालयात गेली. तत्पूर्वी काही गुंडांनी गर्दीचा फायदा घेत दोघी माय-लेकींना धक्काबुक्की केली. काही वेळाने माहिती अधिकाराची कागदपत्रे घेऊन त्या दोघी तक्रार देण्यासाठी ठाण्यात जाणार, तोच प्रवेशद्वारासमोर विवाहितेच्या सासू-सासऱ्यांनी त्यांना अडविले. तिथे दोघांत शाब्दिक बाचाबाची सुरू असताना सासूने तीक्ष्ण हत्याराने विवाहितेच्या डाव्या हातावर वार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे

Web Title: Annoying! Attack on rape victim by her father-in-law's congregations