शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

१०३ उमेदवारांची अंतिम निवड जाहीर

By admin | Updated: June 18, 2014 01:30 IST

हिंगोली : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ च्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त असलेल्या १०३ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

हिंगोली : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ च्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त असलेल्या १०३ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तात्पुरत्या यादीवर एकही आक्षेप न आल्याने भरतीप्रमुख तथा अप्पर पोलिस अधीक्षक शाम घुगे, प्रभारी समादेशक ए.एल.फुफाटे यांनी उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली आहे.
या प्रकियेत १०३ जागांसाठी २ हजार ८९५ उमेदवारांनी अर्ज भरला होता. कागदपत्र पडताळणी तसेच उंची व छातीचे मोजमाप घेतल्यानंतर २ हजार २६५ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले होते. त्यातील १३५४ जण लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले. परंतु परिक्षेला ४८ उमेदवार गैरहजर राहिल्याने केवळ १ हजार ३०६ उमेदवारांचीच परीक्षा घेण्यात आली. परिक्षेनंतर लगेच उत्तरपत्रिकांची तपासणी करून निकाल जाहीर करून तात्पुरत्या स्वरूपातील निवड यादी लावण्यात आली. त्यावर कुणाला आक्षेप असल्यास २४ तासाच्या आत तक्रार नोंदवण्याची सुचनाही देण्यात आली होती. परंतु याबाबत एकही तक्रार न आल्याने रविवारी दुपारी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. गुणवत्ता व प्रवर्गानुसार १०३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गाच्या ४९ जागा भरताना २ प्रकल्पग्रस्त, २ खेळाडू, १ भुकंपग्रस्त व ४४ नियमित उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. अनुसुचित जातीच्या ११ जागांमध्ये १ प्रकल्पग्रस्त, १ बॅन्डस्मन या उमेदवारांचा समावेश आहे. अनुसुचित जमाती-१२, डीटीए-४, एनटीबी-३, विशेष मागास प्रवर्गाच्या ६ जागांसाठी नियमित उमेदवार निवडण्यात आले आहेत. एनटीडीच्या ७ जागांमध्ये एका अनुकंपाधारकाची निवड झाली आहे. ओबीसीच्या ११ जागांमध्येही प्रकल्पग्रस्त, खेळाडू व होमगार्ड यांना प्रत्येकी १ अशा ३ जागा मिळाल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी भरतीप्रमुख म्हणून काम पाहिले. एसआरपीएफचे प्रभारी समादेशक ए.एल.फुफाटे यांनी त्यांना सहकार्य केले. एसआरपीएफच्या अंतिम निवड यादीतील शेवटच्या उमेदवारांचे गुण (कट आॅफ लाईन) खुला प्रवर्ग- १७३, अनुसुचित जाती-१६६, अनुसुचित जमाती-१५३, डीटीए-१७०, एनटीबी-१६९, एनटीडी-१६६, एसबीसी-१५२, ओबीसी-१६९ असे आहेत. (प्रतिनिधी)