शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणाची सोडत जाहीर

By admin | Updated: June 28, 2014 01:20 IST

औरंगाबाद : आगामी अडीच वर्षांसाठी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी जाहीर झाली. सोडतीदरम्यान इच्छुकांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ असे वातावरण बघायला मिळाले.

औरंगाबाद : आगामी अडीच वर्षांसाठी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी जाहीर झाली. सोडतीदरम्यान इच्छुकांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ असे वातावरण बघायला मिळाले. ९ पैकी ७ सभापतींची पदे विविध प्र्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव झाली. त्यामुळे सभापतीपदाचे अनेकांचे मनसुबे धुळीला मिळाले. सोडतीमुळे हिरमोड झालेल्या काही जणांनी अर्ध्यातूनच सभागृहातून काढता पाय घेतला. दुसरीकडे ज्यांच्या पंचायत समितींचे पद अराखीव राहिले त्यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद ओसंडून वाहत होता. जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापतींची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे येत्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आज सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके आणि संभाजी अडकुणे यांच्या उपस्थितीत ही सोडत निघाली. यावेळी पंचायत समित्यांमधील इच्छुक सदस्य आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी पैठण पंचायत समिती सभापतींची जागा आरक्षित करण्यात आली. सर्व तालुक्यातील अनुसूचित जातींची संख्या विचारात घेऊन हे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमातीची लोकसंख्या आणि याआधीचे आरक्षण या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन या प्रवर्गासाठी कन्नडची जागा राखीव केल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर चिठ्ठ्या टाकून ओबीसी प्रवर्गासाठी वैजापूर आणि फुलंब्री या दोन जागा निश्चित करण्यात आल्या. यातील फुलंब्रीची जागा ओबीसी महिलांसाठी राखीव ठरली. उर्वरित पाचपैकी तीन जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करावयाच्या होत्या. त्यासाठी पुन्हा चिठ्ठ्या टाकण्यात आली. तेव्हा सोयगाव, खुलताबाद आणि सिल्लोडचे सभापतीपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी गेले आहे. औरंगाबाद आणि गंगापूरची सभापती पदे ही सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी सुटली आहेत. सोडतीदरम्यान उपस्थितांच्या चेहऱ्यावर कधी आनंद, तर कधी नाराजी दिसून आली. सभापतीपद दुसऱ्या प्रवर्गाला सुटल्यानंतर अनेक इच्छुकांनी सभागृहातून लगेच काढता पाय घेतला. पंचायत समिती सभापतींचे प्रवर्गनिहाय आरक्षणपैठण एससी (महिला)कन्नड एसटी फुलंब्री ओबीसी (महिला)वैजापूर ओबीसी सोयगाव खुला (महिला)खुलताबाद खुला (महिला)सिल्लोड खुला (महिला)गंगापूर खुलाऔरंगाबाद खुला