शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

...संप मागे घेतल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांत नाराजी...!

By admin | Updated: July 13, 2014 00:45 IST

औरंगाबाद : राज्यातील १२ हजार वैद्यकीय अधिकारी सलग आठ दिवस संपावर गेल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडून गेली होती.

औरंगाबाद : राज्यातील १२ हजार वैद्यकीय अधिकारी सलग आठ दिवस संपावर गेल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडून गेली होती. डॉक्टरांच्या मागण्या तडकाफडकी मार्गी लागतील, असे वातावरण असताना पुन्हा एकदा शासनाच्या आश्वासनानंतर मॅग्मो संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेतला. या निर्णयामुळे मॅग्मो संघटनेचे सदस्य असलेल्या राज्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अनेक डॉक्टर संघटना सोडण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुख्यत: ग्रामीण आणि आदिवासी भागात जाऊन साथरोग असो किंवा लसीकरणासारखे राष्ट्रीय काम, जीवाची पर्वा न करता पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी झटतात. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात १२ हजार राजपत्रित वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. यापैकी अनेक वैद्यकीय अधिकारी १० ते १५ वर्षे अस्थायी म्हणून कार्यरत होते. २००८ मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले होते. २००९-१० मध्ये शासन सेवेत समावेश न झालेल्या डॉक्टरांना पूर्वलक्षी लाभाने वेतनवाढ द्यावी, अस्थायी ७८९ बी. ए. एम. एस. डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी व अस्थायी ३२ बी. डी. एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गट ‘ब’मध्ये सेवा समावेशन करावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे, बी. ए. एम. एस. डॉक्टरांना पदोन्नती द्यावी आदी मागण्या करण्यात आल्याहोत्या. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने वेळोवेळी आंदोलने केली होती. शासनाने प्रत्येक वेळी तोंडी आणि लेखी आश्वासने दिली. महिनाभरापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता करावी, यासाठी सुरू केलेला संप अंतिम टप्प्यात होता. आता आपल्या सर्व मागण्या मार्गी लागतील, अशी सर्व डॉक्टरांना अपेक्षा होती. शासनाकडून मेस्मा लागू करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतरही एकही वैद्यकीय अधिकारी अस्थिर झाला नव्हता. संपाच्या शेवटच्या दिवशी तर डॉक्टरांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवली होती. मात्र, अचानक मुंबईहून फोन आला आणि मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याचे सांगून संप मागे घेण्यात आल्याचे कळविण्यातआले.विशेष म्हणजे शासनाकडून मॅग्मो संघटनेला यापूर्वी ४३ वेळा आश्वासने मिळाली होती, असे संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी संप मागे घेण्यापूर्वी अध्यक्षांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते.संप मागे घेण्याचा निर्णय चुकलाकेवळ आश्वासनाच्या आधारे संप मागे घेण्याचा निर्णय चुकला आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय अधिकारी नाराज झालेले आहेत. संपातून काय साध्य केले ते ४ दिवसांत समजेल-डॉ. संदीपान काळे, जिल्हाध्यक्ष, औरंगाबाद