छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेले शिवबा संघटनेचे माजी सहकारी अमोल खुणे यांनी आज पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. "मी जरांगे यांच्या खोटेपणाचा भंडाफोड करीन, या भीतीने त्यांनी माझ्यावर हत्येचा कट रचल्याचा खोटा गुन्हा दाखल केला," असा दावा खुणे यांनी केला आहे.
मुंडेंचा संबंध नाही, कॉल डिटेल्सचा पुरावा अमोल खुणे म्हणाले की, या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला, मात्र चार्जशीटमधील कॉल डिटेल्स पाहता माझे आणि मुंडे यांचे कधीही बोलणे झालेले नाही, हे स्पष्ट झाले आहे. "केवळ राजकीय वैमनस्यातून मुंडे यांचे नाव घेतले गेले," असेही त्यांनी स्पष्ट केले. जामीन मिळाल्यानंतर खुणे यांनी आता जरांगे यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.
आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह जरांगे पाटील नेहमी आपण गरीब असल्याचे सांगतात, मग त्यांच्याकडे आणि त्यांच्या मुलांकडे लाखांचे मोबाईल कुठून येतात? वाहनांच्या डिझेलचा आणि ताफ्याचा खर्च कोण करतं? असा सवाल खुणे यांनी उपस्थित केला. तसेच, कोपर्डीच्या आरोपींवर झालेला हल्ला हा जरांगे यांच्याच सांगण्यावरून झाला होता, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
नार्को टेस्ट आणि आंदोलनाचा इशारा "सत्य बाहेर येण्यासाठी मनोज जरांगे आणि माझी नार्को टेस्ट करावी," अशी मागणी खुणे यांनी जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अन्यथा १९ फेब्रुवारीपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Web Summary : Amol Khune alleges Zarange falsely accused him of plotting murder to conceal his lies. Khune demands a narco test and SIT investigation, questioning Zarange's finances.
Web Summary : अमोल खुने का आरोप, जरांगे ने झूठ छुपाने के लिए हत्या की साजिश में फंसाया। खुने ने नार्को टेस्ट और एसआईटी जांच की मांग की, जरांगे के वित्त पर सवाल उठाया।