'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने

By बापू सोळुंके | Updated: December 20, 2024 13:59 IST2024-12-20T13:59:11+5:302024-12-20T13:59:59+5:30

प्रत्येक पदाधिकारी यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र होते.

'Amit Shah apologize!'; Uddhav Sena protests in Chhatrapati Sambhajinagar with loud slogans | 'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने

'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने

छत्रपती संभाजीनगर :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भाषण करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शुक्रवारी सकाळी क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनात सहभागी कार्यकर्ते आणि पदाधिकारी अमीत शाह यांच्या फोटोला फुली मारलेले बॅनर हातात घेऊन घोषणा देत होते. शिवाय प्रत्येक पदाधिकारी यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि पूजन करून या आंदोलनाला सुरुवात झाली. अमित शहा यांच करायचे काय ?खाली मुंडके वर पाय !,जय भीम बोलो ,जय भीम, सब मिलके बोलो जयभीम, डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अमित शहा राजीनामा द्या, राजीनामा द्या, शिवसेना जिंदाबाद, उध्दव ठाकरे जिंदाबाद, अमीत शाह माफी मागा, अशा गगनभेदी घोषणा देत उध्दव सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी क्रांती चौक परिसर दणाणून सोडला. 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेृत्वाखालील या आंदोलनात माजी महापौर नंदकुमार घोडेले, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हा प्रमुख त्र्यंबक तुपे, शहर संघटक बाळासाहेब थोरात ,गोपाल कुलकर्णी, चेतन कांबळे, प्रभाकर मते ,चंद्रकांत इंगळे ,संतोष खेंडके पाटील, पप्पू व्यास, राजू इंगळे , सुदाम सोनवणे,महिला आघाडीच्या सुकन्या भोसले , आशा दातार ,मीरा देशपांडे ,दुर्गा भाटी, दिग्विजय शेरखाने, छाया देवरथ, विजय वाघमारे आणि ज्ञानेश्वर डांगे आदी सहभागी झाले होते.

Web Title: 'Amit Shah apologize!'; Uddhav Sena protests in Chhatrapati Sambhajinagar with loud slogans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.