शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मनपा, एमएसआरडीसीच्या वादात क्रांतीचौक उड्डाणपूल खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:42 IST

जालना रोडवरील क्रांतीचौकातील उड्डाणपुलावरील खड्डे मनपा आणि एमएसआरडीसीच्या वादामुळे जीवघेणे होऊ लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना रोडवरील क्रांतीचौकातील उड्डाणपुलावरील खड्डे मनपा आणि एमएसआरडीसीच्या वादामुळे जीवघेणे होऊ लागले आहेत. तो पूल उभारणीपासून वादग्रस्त राहिलेला आहे. पुलाचे दोन पिलर्स पाडून नव्याने बांधावे लागण्यापासून, तर पुलाच्या गुणवत्तेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. शहरातील अतिशय निकृष्ट व दर्जाहीन असलेला तो पूल असून, त्यावरील डांबरीकरण मागील तीन वर्षांत वारंवारउखडत आहे. पुलावरील धोकादायक वळण असलेल्या भागावरच खड्डे पडल्यामुळे वाहन चालविताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.५ वर्षांतच तो पूल २५ वर्षे जुना असल्यासारखे वाटू लागले आहे. पुलावरील सरफेस उखडून गेला असून, काँक्रीटीकरण केलेल्या पृष्ठभागावरील लोखंड मध्यंतरी उघडे पडले होते. त्यावर सिमेंटचा थर टाकण्यात आला. त्यामुळे पुलावर स्पीडब्रेकर निर्माण झाले. पुलावरील वळण अतिशय धोकादायक असल्यामुळे त्याला दोन्ही बाजूंच्या आतील दिशेने बॅरिकेडस् लावून सुरक्षा कठड्यांची उंची वाढविण्यात आली. त्या वळणामुळे झालेल्या बहुतांश अपघातात अनेकांचे प्राण गेले आहेत.