‘रुग्णवाहिकेस प्रथम प्राधान्य’ जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 21:24 IST2018-12-23T21:24:43+5:302018-12-23T21:24:55+5:30
२४ व २५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत व सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत रुग्णवाहिकेसाठी जागा उपलब्ध कशी करावी, यासाठी रुग्णवाहिकांची रंगीत तालीम घेऊन जनजागृती केली जाईल.

‘रुग्णवाहिकेस प्रथम प्राधान्य’ जनजागृती मोहीम
औरंगाबाद : वाहतूक व्यवस्थापन कायद्यानुसार वाहतूक मार्गावरील प्रत्येक वाहनचालकाने रुग्णवाहिकेस प्रथम मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या विषयावर जनजागृती करण्यासाठी मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन औरंगाबाद आणि वाहतूक शाखा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने याविषयी माहिती देणारा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि. २४ व २५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत व सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत रुग्णवाहिकेसाठी जागा उपलब्ध कशी करावी, यासाठी रुग्णवाहिकांची रंगीत तालीम घेऊन जनजागृती केली जाईल. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.