शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत काँग्रेस, राकाँत फोडाफोडीचे राजकारण !

By admin | Updated: October 12, 2014 00:32 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल, तसतसे केज विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलू लागले आहेत. केजमधील अंबाजोगाई तालुका हे मतांचे मोठे पॉकेट आहे.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईमतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल, तसतसे केज विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलू लागले आहेत. केजमधील अंबाजोगाई तालुका हे मतांचे मोठे पॉकेट आहे. यामुळे अंबाजोगाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. आता तर अंबानगरीत फोडाफोडीचे राजकारण रंगू लागले आहे.केज विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई शहर हे मतांचे मुख्य पॉकेट आहे. उमेदवाराला निवडणूक जिंकण्यासाठी अंबाजोगाई शहरावर आपला वचक बसविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदकिशोर मुंदडा तर काँग्रेस पक्षाच्या वतीने राजकिशोर मोदी या दोघांची शहरावर मजबूत पकड आहे. अंबाजोगाई शहरावर आपले अधिराज्य टिकवण्यासाठी मोदी-मुंदडा यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या झालेल्या सभेत राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम शेख नबी, माजी नगरसेवक नागनाथ जोगदंड, रविंद्र साठे, अशोक मोदी, रमेश चव्हाण, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर याला प्रतिउत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अक्षय मुंदडा यांनी राजकिशोर मोदी यांचे खंदे व अत्यंत विश्वासू समर्थक संतोष शिनगारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. आता ते राष्ट्रवादीत मुंदडांच्या बाजूने सामील झाले आहेत तसेच काँग्रेस पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष सय्यद मुर्तुजा मोमीन यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघााडीच्या प्रदेश सरचिटणीस सुनंदा टाक यांनी आडस येथे आ. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आडस येथे भाजपामध्ये प्रवेश केला. अंबाजोगाई शहरात प्रमुख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यातच सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या सुरू झालेल्या या पळवापळवीमुळे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागले आहेत.