शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कंत्राटदार बदलले तरीही 'औरंगाबाद-जळगाव' रस्त्याचे काम अद्याप ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 19:50 IST

पाठपुरावा करणाऱ्या अभियंत्यांच्या टीमची बदली

ठळक मुद्देरस्त्याचे काम सुरू होऊन १६ महिने झाले आहेत. १६ महिन्यांत २० टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते जळगाव या रस्त्याचे चौपदरीकरण होण्यासाठी अजून दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे लेणीप्रेमी पर्यटकांना दीड वर्ष लांब पल्ल्यावरून प्रवास करीत लेण्यांकडे जाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. 

अवसायनात निघालेल्या आंध्र प्रदेशाच्या ऋत्विक एजन्सी या कंत्राटदार कंपनीने नॅशनल हायवे विभागाला हात दिल्यामुळे हा सगळा प्रकार घडला असून, सर्व स्तरातून ओरड सुरू झाल्यानंतर विभागाने तीन कंत्राटदार या कामासाठी नेमले आहेत. रस्त्याचे काम सुरू होऊन १६ महिने झाले आहेत. १६ महिन्यांत २० टक्केदेखील काम पूर्ण झालेले नाही. कामाची एवढी संथगती असताना प्रशासकीय यंत्रणेला मुंबईतील मुख्यालयाला  आदेशाविना काहीही करता आले नाही. परिणामी पर्यटक, नागरिक, प्रशासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांसह एस. टी. महामंडळाला त्या रस्त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. आणखी दीड वर्ष रस्त्याचे काम पूर्ण होणार नसल्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना व अपघाताना कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न आहे. ऋत्विक एजन्सीवर मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे. त्याचा परिणाम या कामावर झाल्यामुळे कंत्राटदार कंपनीने साहित्य सोडून येथून काढता पाय घेतला. अधीक्षक अभियंत्यांची बदली दोन महिन्यांत रस्त्याची परिस्थिती चांगली होईल, असा दावा करणारे नॅशनल हायवेचे अधीक्षक अभियंता एल. एस. जोशी यांची बदली मुंबईला झाली . एकतर्फी रस्ता सध्या सुरू आहे. बीटी व काँक्रीटचे काम सुरू आहे. १ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. १५ ते १८ महिने तरी काम होण्यासाठी लागतील. रावसाहेब चव्हाण आणि कामटे व अन्य एक, अशा तीन कंत्राटदारांकडे काम आहे. ८० टक्के काम बाकी आहे. कंत्राटदार बदलल्यामुळे एका महिन्यात चांगले परिणाम येण्याची शक्यता असतानाच अधीक्षक अभियंता जोशी, उपअभियंता खडलसे यांची बदली झाली आहे. या कामासाठी पाठपुरावा करणारी अधिकाऱ्यांची टीमच बदलून गेल्यामुळे काम आता रामभरोसे आहे.

सव्वावर्षात फक्त २० टक्केच कामपहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी तर तिसऱ्या टप्प्यात ३१६ कोटी, अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली होती. पूर्वी ३०० कोटींच्या आसपास कंत्राट होते. त्यात ७०० कोटींची नव्याने वाढीव तरतूद केली. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रुंद व मध्यवर्ती भागात दुभाजकासह तो रस्ता काँक्रिटीकरणातून करण्याचे नियोजन आहे. ऋत्विक एजन्सीला २० टक्के कामाचा मोबदला मोठ्या प्रमाणात दिला, परंतु तो कंत्राटदार काम करीत नसल्यामुळे त्याच्या जागी दुसरे कंत्राटदार नेमले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधीhighwayमहामार्गJalgaonजळगाव