शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

महायुतीचे जागा वाटप संपले; छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या जागांवर शिरसाट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 2:09 PM

शिवसेना शिंदे गट यावेळी किती जागा लढणार हे देखील आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले

छत्रपती संभाजीनगर: लोकसभेची छत्रपती संभाजीनगरची जागा निवडून आणणे महायुतीचे ध्येय आहे. येथील उमेदवार हा शिवसैनिक असेल. आम्ही बैठक घेतली असून एकनाथ शिंदे यांनी सर्वांशी संवाद साधला आहे. जागे विषयी चर्चा आता संपली आहे. केवळ उमेदवार जाहीर करणे बाकी असल्याची माहिती शिवसेना शिंदेगट प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महायुतीच्या जागा वाटपावर शिरसाट म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी प्रदीर्घ बैठक घेतली असून सर्व जागा निवडून आणायची चर्चा झाली. यानुसार शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडेच राहणार आहेत. तर २ तारखेपासून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणनीती आखली गेली आहे. महायुतीमध्ये तिढा नाही, आम्हाला अंदाज आहे १६ पेक्षा कमी जागा शिवसेनेला मिळणार नाही, असेही शिरसाट म्हणाले. 

काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपसोबत संबंधनाशिकची जागा शिवसेनेला मिळणार आहे. एखाद्या मतदारसंघात कमजोर उमेदवार असेल तर जागा बदलता येईल. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपसोबत संबंध आहे.काही छुपा पाठिंबा देत आहेत. लवकर पक्ष प्रवेश होईल असा दावाही शिरसाट यांनी केला. तसेच रोहित पवार हे कुणाचा प्रचार करतात हे कन्फ्युजन आहे. तर संजय राऊत हे पिलेल्या सारखे बोलतात. त्यांना लोकांच्या दारात जाऊन नाचायच असत. मोदींची तुलना करण्याची राऊत यांची लायकी नाही, अशी टीकाही यावेळी शिरसाट यांनी केली.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीAurangabadऔरंगाबाद