शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या नगरसेवकांना भूखंडात रस

By admin | Updated: December 19, 2014 00:58 IST

औरंगाबाद : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांचा सध्या भूखंड प्रकरणात रस दिसत असून

औरंगाबाद : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांचा सध्या भूखंड प्रकरणात रस दिसत असून भूखंडांवरील आरक्षण उठविणे, अशी आरक्षणे उठविणासाठी मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना न्यायालयाचा आदेश डावलून नियुक्ती देण्याचा घाट घालणे, टीडीआर प्रकरणांसाठी नागपूरवारी करणे आदी प्रकार काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी चालविलेले आहेत. क्रांतीचौक येथील भूखंडाचे आरक्षण उठविण्यात रस दाखविणारे सर्व नगरसेवक हे सत्ताधारी शिवसेना, भाजपा युतीचे होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेल्या एका नगरसेवकाचा समावेश होता. शहरातील पाणीटंचाई किंवा साफसफाई याबाबत कधीही सकारात्मक भूमिका न घेणाऱ्या या नगरसेवकांनी मागील काही वर्षांत भूखंडांच्या प्रकरणांमध्ये अधिक रस दाखविल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच काही नगरसेवकांना पाठिंबा मिळत असल्याने किंवा काही जण हे वरिष्ठ नेत्यांच्या हातचे बाहुले असल्यामुळे त्यांना नेते आदेश देतील त्याप्रमाणे वागावे लागत असल्याचे चित्र आहे. भाजपाचे तर औरंगाबादेत शहर, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी आहेत. मात्र, या कुणाचाच अंकुश नगरसेवकांवर नाही. त्यामुळे तीन-चार ‘चलाख’ नगरसेवकांनी काही दिवसांपासून भूखंडाच्या प्रकरणांत रस दाखविला.