शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धापकाळात आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना चपराक, मुलींनीच पार पाडले सर्व अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 17:42 IST

२५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील लिहाखेडी येथील एका ९० वर्षीय महिलेचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. २५ वर्षांपूर्वी आईला घरातून हाकलून देत वाऱ्यावर सोडलेल्या तीन भावांना संतप्त बहिणींनी अंत्यसंस्कार करू देण्यास नकार देत स्वतः सर्व विधी केले. तिन्ही बहिणींनी अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार स्वतः करत मृतदेहास अग्निडाग देत आपले कर्तव्य बजावले. वृद्धापकाळात आईकडे दुर्लक्ष करणाऱ्या उच्चपदस्थ मुलांबाबत नागरिक आणि नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

चंद्रभागाबाई आनंदा साखळे (९० वर्ष रा.लिहाखेडी ता.सिल्लोड हल्ली मुक्काम औरंगाबाद ) असे मृत महिलेचे नाव आहे.तर अंत्यसंस्कार पार पाडणाऱ्या मुलींचे नावे सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे रा.औरंगाबाद, सुनीता शिवाजी सोने रा.अनवी, जिजाबाई  उत्तम टाकसाळे  रा.कोटनांद्रा, जाऊ छायाबाई शिरसाठ रा.लिहाखेडी ता.सिल्लोड असे आहेत.

चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांना  तीन मुले आणि तीन मुली आहे. मोठा मुलगा औरंगाबाद येथे कृषी अधिकारी होता तो आता निवृत्त झाला आहे.मधला मुलगा हायकोर्टात क्लर्क आहे. तर लहान मुलगा एका खाजगी  कंपनीत नोकरीला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून तिन्ही मुलांना मोठे केले नोकरीला लावले, पण स्थिर झाल्यानंतर शुद्ध हरपलेल्या या मुलांनी आईस सांभाळायला सपशेल नकार देत घरातून हाकलून दिले. यामुळे औरंगाबाद येथे राहत असलेल्या सुभद्रा व  श्रीकृष्ण टाकसाळे या मुलीने व जावयाने त्यांचा सांभाळ केला. मागील २० वर्षांपासून त्या या मुलीकडे राहत होत्या.

मुली व जावयाने तिन्ही मुलांना अनेक वेळा फोन केला आईची तब्बेत खूप खराब आहे भेटायला या पण ते आले नाही. आईचे निधन झाल्याचे कळल्यावर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी दोन भाऊ औरंगाबाद येथे बहिणीच्या घरी आले. आईचे शेवटचे दर्शन न घेता पाहुण्यांसारखे लांब उभे राहिले. सर्वात मोठा मुलगा तर  आईच्या अंतिमसंस्कारसाठी आलाच नाही. हे सर्व पाहून चंद्रभागाबाई यांच्या तिन्ही लेकिंनी, हर्सूल बालाजी नगर परिसरातील सर्व मंडळी तसेच नातलगांनी आईच्या मृतदेहालासुद्धा त्या मुलांना हात लावू देणार नाही असा पावित्रा घेतला. शेवटी जिजाबाई, सुभद्रा व सुनीता ह्या तिन्ही लेकींनी व जाऊ छायाबाई शिरसाठ यांनी सर्व अंतिमसंस्कार पार पाडले.

आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोठे केले आज ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सख्या आईच्या म्हातारपणात,आजारपणात  त्यांनी लक्ष दिले नाही. घरातून हाकलून दिले ती आजारी असताना तिला जिवंतपणी भेटायला आले नाही. इतकेच नव्हे तर मोठा मुलगा अंतिमसंस्कारासाठी ही आला नाही अशा निर्दयी  मुलांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर मुलगी सुभद्रा  आणि जावई श्रीकृष्ण  टाकसाळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या केलेल्या सेवेसाठी  त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंत्यसंस्कारावेळी माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या सह परिसरातील नागरिक, नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद