मद्यपि बस चालक-वाहकास पकडले
By Admin | Updated: May 23, 2014 00:19 IST2014-05-22T23:53:55+5:302014-05-23T00:19:32+5:30
लातूर : दारू पिऊन एसटी बस चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने मार्ग तपासणी पथकाने कराड आगाराच्या चालक व वाहकास पकडले़

मद्यपि बस चालक-वाहकास पकडले
लातूर : दारू पिऊन एसटी बस चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने मार्ग तपासणी पथकाने कराड आगाराच्या चालक व वाहकास पकडले़ ही कार्यवाही गुरुवारी सायंकाळी ७़३० च्या सुमारास मुरुड बसस्थानकात करण्यात आली़ दरम्यान, या पथकाने बसमधील १८ प्रवाशांना दुसर्या एसटीत बसवून लातूरला पाठवून दिले़ कराड आगाराची कराड- लातूर (एमएच- १४, बीटी- ३५७७) ही बस गुरुवारी सायंकाळी ७़३० च्या सुमारास मुरुड येथील बसस्थानकात पोहोचली़ तेव्हा तिथे असलेल्या मार्ग तपासणी पथकाचे प्रमुख सिध्देश्वर रासूरे, विजय बनसोडे, बापू साळुंके यांनी तपासणी करण्यासाठी बसमध्ये प्रवेश केला़ तेव्हा वाहक डी़ एस़ जगताप यांच्या संशयास्पद हलचाली आढळून आल्या़ त्यामुळे त्यांनी विचारणा केली असता तो मद्यधुंद असल्याचा संशय आला़त्यामुळे रासूरे यांनी बसचालक एस़ आऱ कदम यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या उत्तरावरुन त्यांनीही मद्यप्राशन केल्याचा संशय आला़ मद्यपी वाहक व चालकामुळे अपघात होऊ नये म्हणून या पथकाने बसमधील १८ प्रवाशांना उतरवून दुसर्या बसमध्ये बसविले.(प्रतिनिधी)प्रवाशांच्या तिकीटाची तपासणी केली असता एका प्रवाशास ४८ रुपयांचे तिकीट कमी देण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले़ याप्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात रात्री तक्रार देण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती़