अजिंठा लेणीत जाण्यासाठी चार रस्ते असताना एकच का सुरू? गाईड असोसिएशनचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 20:35 IST2026-02-23T20:30:50+5:302026-02-23T20:35:02+5:30

विक्रेत्यांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर गाइड दहशतीच्या वातावरणातच अजिंठा लेणीत पर्यटकांना मार्गदर्शनाचे काम करत आहेत.

Ajanta Caves News: Guide Association Demands Opening of All 4 Access Roads Amid Safety Concerns | अजिंठा लेणीत जाण्यासाठी चार रस्ते असताना एकच का सुरू? गाईड असोसिएशनचा सवाल

अजिंठा लेणीत जाण्यासाठी चार रस्ते असताना एकच का सुरू? गाईड असोसिएशनचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जाण्यासाठी चार रस्ते आहेत. परंतु केवळ शॉपिंग प्लाझामधून जाणारा रस्ता सुरू ठेवण्यात आला आहे. हे चारही रस्ते खुले करण्याची मागणी गाइड असोसिएशनकडून होत आहे. विक्रेत्यांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर गाइड दहशतीच्या वातावरणातच अजिंठा लेणीत पर्यटकांना मार्गदर्शनाचे काम करत आहेत.

टुरिस्ट गाईड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भरत जोशी म्हणाले, शाॅपिंग प्लाझा हे ‘एमटीडीसी’च्या अखत्यारित आहे. ‘एमटीडीसी’ने पूर्वीचे बंद केलेले चारही रस्ते खुले केले पाहिजेत. एकच रस्ता असावा, असा कोणताही नियम नाही. ज्यांना खरेदी करायची आहे, ते जातील. ज्यांना त्यात स्वारस्य नाही त्यांच्यावर जबरदस्ती नको. पार्किंगपासून ते लेणीपर्यंत आणि लेणीपासून पार्किंगपर्यंत पर्यटकांचा वस्तू विक्रीसाठी आणि दुकानात घेऊन जाण्यासाठी विक्रेते पाठलाग करतात. पर्यटकांवर आणि गाइडवर दडपण आणले जाते. आमिष दाखवले जाते. चारही बाजूंनी घेरून शिवीगाळ केली जाते. हात धरून दुकानाकडे ओढले जाते. हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पर्यटनावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. यास शासनाने पायबंद घातला पाहिजे.

स्वेच्छेने खरेदी करण्यास असोसिएशनचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पिच्छा पुरवणे हे लेणीच्या ठिकाणी योग्य नाही. अजिंठ्याच्या भित्तिचित्राचे आणि भारतीय संस्कृतीचे ३ तास गायलेले गोडवे, केलेले वर्णन मातीमोल होऊन जाते. आम्ही पोलिस अधिकारी, ‘एमटीडीसी’, भारतीय पर्यटन विभाग, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांना निवेदन देणार आहोत. त्यावर कार्यवाही झाली नाही तर अजिंठा लेणीत काम बंद करण्याचा निर्णय घेऊ, असेही भरत जोशी यांनी सांगितले.

जबरदस्ती नको
गाइडवर हल्ला करून अपशब्द बोलणे, हे निंदनीय आहे. गाइडचे काम हे खूपच सन्मानजनक आहे. निदान ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. केवळ गैरसमजातून जर गाइडवर राग काढत असाल तर ते चुकीचे आहे. पर्यटकांना त्यांच्या इच्छेनुसार फिरण्याची मुभा पाहिजे. जर त्यांना शॉपिंग प्लाझामध्ये जाण्याची इच्छा नसेल तर कुणीही जबरदस्ती करू नये. कारण, पर्यटकांचे प्राधान्य लेणी पाहण्याचे असते.
- राहुलदेव एस. निकम, अध्यक्ष, अजिंठा गाइड असोसिएशन

Web Title : अजंता गुफाएँ: गाइड एसोसिएशन ने पूछा, केवल एक सड़क क्यों खुली है?

Web Summary : गाइड एसोसिएशन ने सभी चार अजंता गुफा सड़कों को खोलने की मांग की, विक्रेताओं द्वारा पर्यटकों को खरीदारी के लिए मजबूर करने का हवाला दिया। मांगें पूरी न होने पर काम रोकने की धमकी।

Web Title : Ajanta Caves: Guide association questions why only one road is open.

Web Summary : Guide association demands all four Ajanta cave roads be opened, citing tourist harassment by vendors pressuring purchases. They threaten work stoppage if demands aren't met.