अहिल्याबाई होळकरांनी केला होता वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर व कुंडाचा जीर्णेाद्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:25 IST2025-05-31T19:25:35+5:302025-05-31T19:25:57+5:30

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराव भोसले यांनी या मंदिराचा १६ व्या शतकात पहिल्यांदा जीर्णेाद्धार केला होता.

Ahilyabai Holkar had renovated the Ghrishneshwar Temple and Shivalaya Tirtha in Verul. | अहिल्याबाई होळकरांनी केला होता वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर व कुंडाचा जीर्णेाद्धार

अहिल्याबाई होळकरांनी केला होता वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर व कुंडाचा जीर्णेाद्धार

छत्रपती संभाजीनगर : अहिल्याबाई होळकर या त्यांच्या कार्यामुळे त्या आजही ‘पुण्यश्लोक’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी धार्मिक प्राचीन वारसा जतनाचे मोठे कार्य केले. त्यात १२ ज्योतिलिंगांपैकी एक असलेले वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर व शिवालय तीर्थाच्या जीर्णेाद्धाराचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

घृष्णेश्वर महादेव मंदिराचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत उल्लेख आहे. एवढे हे प्राचीन मंदिर आहे. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराव भोसले यांनी या मंदिराचा १६ व्या शतकात पहिल्यांदा जीर्णेाद्धार केला होता. हे मंदिर इतिहासात अनेकदा झालेल्या आक्रमणाने अनेकदा उद्ध्वस्त झाले, अहिल्याबाई होळकर यांनी इ.स. १७८० च्या सुमारास या मंदिराचा जीर्णेाद्धार केला. त्यांनी मंदिराची मूळ वास्तू पुन: उभारून भक्तांसाठी तीर्थक्षेत्र सुरक्षित केले. आजचे घृष्णेश्वर मंदिर हे त्यांच्या दूरदृष्टी आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. या मंदिराला २७ सप्टेंबर १९६० रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कार्यातून केवळ धार्मिक वारसा जपला नाही तर भाविकांसाठीही अनेक सुविधा निर्माण केल्या.

शिवालय तीर्थाचाही जीर्णेाद्धार
घृष्णेश्वर महादेव मंदिरापासून जवळच असलेल्या शिवालय तीर्थाचा जीर्णेाद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला. तसा शिलालेखही तिथे आढळून येतो. हे तीर्थकुंड भारतीय वैभवशाली बांधकामशैलीचे साक्षीदार आहे.

Web Title: Ahilyabai Holkar had renovated the Ghrishneshwar Temple and Shivalaya Tirtha in Verul.